गोदावरी नदीवरील केटीवेअरच्या पूर संरक्षण भिंत बांधण्याच्या प्रस्तावांना मंजुरी द्या-आ. आशुतोष काळे
गोदावरी नदीवरील केटीवेअरच्या पूर संरक्षण भिंत बांधण्याच्या प्रस्तावांना मंजुरी द्या-आ. आशुतोष काळे
गोदावरी नदीवरील केटीवेअरच्या पूर संरक्षण भिंत बांधण्याच्या प्रस्तावांना मंजुरी द्या-आ. आशुतोष काळे

Kopargaon vijay kapse दि १३ नोव्हेंबर २०२६–कोपरगाव मतदार संघातील गोदावरी नदीवर ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या केटीवेअरच्या पूर संरक्षण भिंती बांधण्याच्या कामांना निधी मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. सोमवार (दि.१६) रोजी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होणार आहे. या बैठकीत विविध विषयांबरोबरच कोपरगाव राहाता तालुक्यात गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या डाव्या व उजव्या बाजूस पूर संरक्षक भीत बांधकाम करणे बाबत आढावा घेतला जाणार आहे.त्यामुळे या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केटीवेअरच्या संरक्षण भिंती बांधण्याच्या कामांना निधी मिळावा याबाबतच्या सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्यात येवून हे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे सादर करावेत अशी मागणी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.

गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले कोल्हापूर टाईप बंधारे हे गोदावरी नदीकाठच्या गावातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले आहेत. त्यामुळे हे सर्व बंधारे जपले जाणे व त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. जर ह्या बंधाऱ्यांची वेळीच काळजी घेतली गेली नाही, तर काय दुष्परिणाम होवू शकतात, हे तब्बल तीन वेळा महापुरात वाहून गेल्यामुळे झालेले नुकसान किती मोठे असते हे मंजूर बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रातील उद्धवस्त झालेली शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरून स्पष्ट दिसून येते.त्यामुळे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले सर्व बंधारे सुस्थितीत राहणे हि काळाची गरज आहे.

कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांच्या डाव्या व उजव्या बाजूने पूर संरक्षक भीत बांधकामासाठी निधी मिळावा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत. सोमवार (दि.१६) रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सदरच्या विषयाची गांभीर्याने दखल घेवून सादर केलेल्या प्रस्तावात गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख के.टी.वेअरच्या डाव्या व उजव्या बाजूस, सडे के.टी.वेअरच्या डाव्या व उजव्या बाजूस, मंजूर के.टी.वेअरच्या डाव्या व उजव्या बाजूस, तसेच राहाता तालुक्यातील शिंगवे के.टी.वेअरच्या डाव्या बाजूस व पुणतांबा के.टी.वेअरच्या डाव्या बाजूस पूर संरक्षक भीत बांधकाम करणे या प्रस्तावास मंजुरी देण्यात येवून हे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे सादर करावेत अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.




