शेतकऱ्यांना मदत करत अमृतवाहिनी बँकेची वाटचाल कौतुकास्पद – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

सहकारी बँका या शेतकऱ्यांसाठी हक्काच्या, सहकारी बँकांमधून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी धांदरफळ बु येथे अमृतवाहिनी बँकेच्या 13 व्या शाखेचा शुभारंभ

धांदरफळ फाटा येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या 13 व्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याणराव काळे, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, ॲड माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील घुले, छत्रपती संभाजी नगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चेतन पवार बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे, संपतराव डोंगरे, गणपतराव सांगळे, अरबी रहाणे, रामहरी कातोरे ,बाळासाहेब देशमाने, बँकेचे संचालक किसनराव सुपेकर, संजय थोरात, लक्ष्मण खेमनर, शिवाजी जगताप ,बापूसाहेब गिरी ,अविनाश सोनवणे ,किसनराव वाळके ,अण्णासाहेब शिंदे ,विवेक तांबे, श्रीमती ललिता दिघे, राजू गुंजाळ , मोहनराव करंजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमृतवाहिनी बँकेच्या वतीने रणजीतसिंह देशमुख व गणपतराव सांगळे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, बँकिंग व्यवसाय हा अत्यंत अडचणीचा आहे. मात्र अशा परिस्थिती अमृतवाहिनी बँकेने शेतकऱ्यांना मदत करत अत्यंत चांगली वाटचाल केली आहे. कर्जवाटप, कर्ज वसुली अत्यंत अवघड असते. रिझर्व बॅंकेचे अनेक कडक निर्बंध पाळावे लागतात. अशा परिस्थितीतही बँकेने मोठा व्यवसाय केला आहे. तेरावी शाखा सुरू झाली असून इगतपुरी तालुक्यामध्ये नव्याने 14 वी शाखा सुरू होत आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 44 वर्ष जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून काम केले तर अठरा वर्षे चेअरमन पदी ते राहिले या कार्यकाळात जिल्हा बँकेला अत्यंत शिस्त त्यांनी लावली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून पाईपलाईनचे जाळे निर्माण झाले शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली. ही बँक कारखान्यांना कर्ज देते कारखाने शेतकऱ्यांचे आहेत परिणामी कारखान्यांच्या कर्जातून शेतकऱ्यांना शून्य टक्के पीक कर्ज मिळते. जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांची असून ती अत्यंत शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने चालवा अशा सूचना त्यांनी दिल्या.

तर खासदार कल्याणराव काळे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेतृत्व संगमनेर तालुक्याला आली या जिल्ह्याला मिळणे हे सुदैव आहे. देश पातळीवर राज्य पातळीवर सातत्याने या नेतृत्वाची मोठी मागणी आहे. परंतु संगमनेरच्या सहकारी संस्था आणि इथल्या प्रत्येक माणूस कुटुंबाशी त्यांची असलेले नाते यामुळे त्यांचा या तालुक्याशी मोठा जिव्हाळा आहे. सध्या लोकशाहीची गळचेपी सुरू असून गोकुळच्या माध्यमातून सहकारी संस्थांमध्ये संचालक लादण्याचा प्रयत्न हा निंदनीय असल्याचे ते म्हणाले. तर माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, संगमनेरच्या सहकार हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे देशाला दिशादर्शक आहे. सहकार हे पवित्र काम असून नेतृत्व चांगले असले तर तेथील सहकार मोठा होत असतो याची उदाहरण संगमनेरचे आहे. जिल्हा बँकेवर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे मोठे प्रेम होते. या बँकेच्या माध्यमातून त्यांनी गरीब माणसाला ताकद दिली असे ते म्हणाले.
तर चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी बँक ही लवकरच शेड्युल बँक होणार आहे. या बँकेवर सभासद कर्जदार नागरिक यांचा मोठा विश्वास असून सुमारे 1200 कोटींची उलाढाल आहे तर रणजीत सिंह देशमुख म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीची परंपरा आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात आपण जिल्हा बँकेत काम करणार असून जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अधिक पुढाकार घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रसंगी प्रकाश राहणे, विठ्ठल गव्हाणे अमोल घुले, धनंजय जाधव, विकास कोल्हे, सतीश पोकळे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी धांदरफळ परिसरातील विविध कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत ॲड नानासाहेब शिंदे यांनी केले प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले तर बापूसाहेब गिरी आभार मानले.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व सर्वांना हवेहवेसे
राजकारण हे समाजाच्या प्रगतीसाठी करायचे असे या उद्देशाने लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम काम केले असून कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे. लोकसभा निवडणुकी राज्यातून 14 खासदार त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाला मिळाले. त्यांच्या नेतृत्वामध्ये 2029 ची निवडणूक लढवायची असून कार्यकर्त्यांनी अधिक ताकतीने काम करावे. भाजपच्या फसव्या व जातीय राजकारणाला जनता कंटाळली असून आता शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे नेते असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज असून त्यांचे नेतृत्व सर्वांना हवे हवेचे असल्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी म्हटले आहे.



