आपला जिल्हा

संजीवनीच्या चार प्राध्यापकांची आंतरराष्ट्रीय पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिपमध्ये यशस्वी झेप

संजीवनीच्या चार प्राध्यापकांची आंतरराष्ट्रीय पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिपमध्ये यशस्वी झेप

सिंगापूर आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठांत संशोधन पूर्ण; संजीवनीच्या शैक्षणिक गुणवत्तेला जागतिक स्तरावर नवी ओळख

Kopargaon vijay kapse दि २० नोव्हेंबर २०२६: संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज आणि संजीवनी विद्यापीठाच्या चार प्राध्यापकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप यशस्वीरीत्या पूर्ण करून संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील गुणवत्तेचा जागतिक स्तरावर ठसा उमटविला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांच्या हस्ते चारही प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात

संजीवनीचे प्राध्यापक डॉ. एस. आर. देशमुख, डॉ. ए. व्ही. ब्राह्मणे आणि डॉ. एम. व्ही. कुलकर्णी यांनी सिंगापूरमधील प्रतिष्ठित सरकारी विद्यापीठ असलेल्या ‘सिंगापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथून पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप पूर्ण केली. तर डॉ. एम. बी. गवळी यांनी अमेरिकेतील नामांकित ‘युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेअर’ येथून ही फेलोशिप यशस्वीरीत्या पूर्ण केली.

जाहिरात

यावेळी बोलताना संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे म्हणाले की, पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप ही पीएच.डी. पदवीनंतर संशोधन क्षेत्रात अधिक उच्चस्तरीय प्रावीण्य मिळविण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन पद्धती, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संशोधनविषयक सहकार्य, संयुक्त संशोधन प्रकल्प, दर्जेदार संशोधनपत्रे आणि पेटंट निर्मितीला चालना मिळते.

जाहिरात

या चारही प्राध्यापकांच्या यशामुळे संजीवनीच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या ध्येयाला अधिक बळ मिळणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी चारही प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी संजीवनीच्या चार प्राद्यापकांनी आंतरराष्ट्रीय पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप मिळाविल्याबध्दल सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र.

याप्रसंगी संजीवनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकूर, रजिस्ट्रार डॉ. अमोल ढाकणे, संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. ए. बी. पवार आणि स्थापत्य व संरचनात्मक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. ए. एस. सय्यद आदी उपस्थित होते.

 संजीवनीच्या जागतिक संशोधन प्रवासाला नवे बळ!

संजीवनीच्या चार प्राध्यापकांनी सिंगापूर आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठांतून पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप पूर्ण करणे ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. हे यश संजीवनीची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन संस्कृती आणि जागतिक स्तरावर वाटचाल करण्याची क्षमता अधोरेखित करणारे आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक संशोधनाच्या नव्या संधी निर्माण होतील.

— अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी विद्यापीठ

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे