आपला जिल्हा

के. जे. एस. महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात; प्रा. दीपाली कुलकर्णी यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

के. जे. एस. महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात; प्रा. दीपाली कुलकर्णी यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

के. जे. एस. महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात; प्रा. दीपाली कुलकर्णी यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

Kopargaon vijay kapse दि २० नोव्हेंबर २०२६ : के. जे. एस. महाविद्यालयात विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. दीपाली बळवंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा तसेच बारावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

जाहिरात

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. सी. ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. एस. डी. बालवे यांनी करून दिला. तसेच महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. कुलकर्णी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत; मात्र ती पूर्ण करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी. जीवनात कोणत्याही मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा या गुणांची आवश्यकता असते. तसेच बारावी विज्ञान शाखेनंतर द्याव्या लागणाऱ्या सीईटी परीक्षेचे स्वरूप, त्यातील विविध घटक आणि परीक्षेच्या तयारीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

जाहिरात

उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे यांनी आपल्या मनोगतात या मार्गदर्शन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी निश्चितच दिशा मिळणार असून, हा उपक्रम त्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

लोगो

कार्यक्रमाचे आभार प्रा. पटवर्धन यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. इंगळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे