आपला जिल्हा

गोधेगाव नं. १ सोसायटीच्या अध्यक्षपदी मंगल कानडे, तर उपाध्यक्षपदी रतनबाई साळुंखे यांची बिनविरोध निवड

गोधेगाव नं. १ सोसायटीच्या अध्यक्षपदी मंगल कानडे, तर उपाध्यक्षपदी रतनबाई साळुंखे यांची बिनविरोध निवड

कोल्हे गटाचे वर्चस्व; संस्थेच्या कारभारात महिला नेतृत्वाला संधी

Kopargaon vijay kapse  दि २७ नोव्हेंबर २०२६- तालुक्यातील गोधेगाव नं. १ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाच्या मंगलबाई सुभाष कानडे, तर उपाध्यक्षपदी रतनबाई सखाहरी साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे संस्थेच्या कारभारात महिला नेतृत्वाला संधी मिळाली आहे.

जाहिरात

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, आमदार विवेक कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षपदासाठी मंगलबाई सुभाष कानडे यांच्या नावाची सूचना संचालक बाबासाहेब शामराव कोळसे यांनी मांडली. त्यास वाल्मीक भिकाजी सोळसे यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी रतनबाई सखाहरी साळुंखे यांच्या नावाची सूचना संचालक बाळासाहेब मारुती बोरकर यांनी मांडली. त्यास सुरेश नारायण कानडे यांनी अनुमोदन दिले.

जाहिरात

सहायक निबंधक कार्यालयाचे एस. पी. रुद्राक्ष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी संचालक सुभाष नारायण कानडे, अशोक माधवराव रांधवणे, प्रमोद माधवराव रांधवणे, विनायक पंढरीनाथ उर्किडे, जानकीराम विठ्ठल धने, विठ्ठल बळवंत शिरसाठ, बाजार समितीचे संचालक माधवराव सहादू रांधवणे, सुधाकर शिरसाठ, बाळासाहेब सखाहरी साळुंखे, रविंद्र अर्जुन रांधवणे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

जाहिरात

सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्षा मंगलबाई सुभाष कानडे म्हणाल्या की, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल.

 

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव आण्णासाहेब निकम यांनी काम पाहिले. रविंद्र रांधवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपस्थितांचे आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे