आपला जिल्हा

पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनातून लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी द्या – आ. विवेक कोल्हे

पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनातून लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी द्या – आ. विवेक कोल्हे
पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेण्याच्या सूचना
Kopargaon vijay kapse दि २७ नोव्हेंबर २०२६-कोपरगाव तालुक्यातील पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पुरेशा दाबाने व संस्थांच्या मंजूर कोट्याप्रमाणे पाणी मिळावे,
यासह तातडीने पालखेड विभागाची कालवा सल्लागार समितीची मीटिंग घेण्यात यावी अशी मागणी करत आमदार विवेक कोल्हे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

जाहिरात
दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पालखेड डाव्या कालव्यामध्ये कमी दाबाने पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, या आवर्तनासंदर्भात कालवा सल्लागार समितीची कोणतीही बैठक झालेली नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे. पालखेड चारी क्रमांक ३६ ते ५२ अंतर्गत येणाऱ्या ओगदी येथील जय हनुमान पाणी वापर संस्था (३ आर), करंजी येथील कुंभार गुरुजी पाणी वापर संस्था (५ आर), पढेगाव येथील संत तुकाराम पाणी वापर संस्था (४५ मेन), कासली येथील नारायणगिरी पाणी वापर संस्था (५ एल), सावळगाव येथील यशवंती जलवाटप संस्था (४ एल), तिळवणी ५१ चारी आणि उक्कडगाव ५२ चारी या भागातील शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता आहे.

जाहिरात
सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज असून कालव्यातून कमी दाबाने पाणी सोडल्यास शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणे कठीण होणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व पाणी वापर संस्थांच्या मंजूर कोट्यानुसार पूर्ण दाबाने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना आणि पाझर तलावांसाठी पाणी आरक्षण नसल्यामुळे हे जलसाठे भरण्याची शक्यता कमी असली, तरी किमान शेतीसाठी आवश्यक पाणी मिळावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

जाहिरात
या पार्श्वभूमीवर पालखेड डावा कालव्याच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत तातडीने बैठक आयोजित करून या सर्व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रतिनिधींना बैठकीस निमंत्रित करावे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन रब्बी आवर्तनाचे योग्य नियोजन करावे आणि सर्व लाभधारकांना न्याय द्यावा, अशा स्पष्ट सूचना आमदार विवेक कोल्हे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे