कॅन्सरतज्ञ डॉ. हसमुख जैन यांना पहिला ‘यंग अचिव्हर अवॉर्ड’

अत्याधुनिक कॅन्सर थेरेपी बद्दल मुंबई येथे शानदार सोहळ्यात सन्मान

मुंबई येथे नॅशनल कॅन्सल ग्रिड यांच्यावतीने 2026 चा पहिला यंग अचिव्हर अवॉर्ड’ शानदार कार्यक्रमात देण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व घडवणे आणि नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी योगदान देणाऱ्या तरुण वैद्यकीय तज्ञांचा गौरव करण्याचा या पुरस्कारामधील उद्देश आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध डॉक्टर आणि कॅन्सरतज्ञ, तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे विविध विभाग प्रमुख, डॉक्टर्स उपस्थित होते.

टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मुंबई येथील ब्लड कॅन्सर विभागामध्ये कार्यरत असलेले डॉ. हसमुख जैन यांनी समाजकार्याबरोबर सातत्याने कॅन्सर निर्मूलनासाठी काम केले आहे. डॉ. राहुल पुरवार व डॉ. हसमुख जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये भारतीयांना कॅन्सरची नवी थेरेपी त्यांनी संशोधित केली आहे. आयआयटी मुंबई आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने जवळपास दहा वर्षांच्या संशोधनातून कार टी सेल थेरेपी त्यांनी भारतात विकसित केली आहे. या उपचार पद्धतीमुळे परदेशात होणाऱ्या कोट्यवधी रुपये खर्च येणारे उपचार पद्धतीच्या आता तुलनेने कमी खर्चात भारतात ही उपचार पद्धती उपलब्ध झाली आहे

पाश्चात्य देशांमध्ये 3 ते 4 कोटी रुपयांचा खर्च असणारी ही उपचार पद्धती आपल्याकडे लाख साधारण 30 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चात उपलब्ध आहे.
या उपचार पद्धतीचा आतापर्यंत जवळपास 1000 रुग्णांना लाभ झाला असून, देशातील सुमारे 56 क्लिनिकल सेंटर्समध्ये ती उपलब्ध आहे. इतर रुग्णालयांतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ही सुविधा अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याच्या दिशेने डॉ. हसमुख जैन, डॉ.राहुल पुरवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. डॉक्टर हसमुख जैन यांचे हे ध्येय केवळ भारतापुरते मर्यादित नसून देशातील तसे जगभरातील जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत ही नवीन संशोधित कॅन्सरवरील कार टी सेल थेरेपी पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात डॉ. हसमुख जैन व डॉक्टर जयश्रीताई थोरात यांना गौरविले होते.
डॉ. हसमुख जैन यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे ,डॉ मैथिलीताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, रमेश गुंजाळ ,सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे शंकरराव खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात,अजय फटांगरे ,सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
हा सन्मान कमी खर्चात नवी थेरपी संशोधन करणाऱ्या सर्व टीमचा–डॉ. हसमुख जैन
नॅशनल कॅन्सल ग्रेडच्या वतीने मिळालेला हा पुरस्कार आयआयटी मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधील संशोधनामध्ये असलेल्या संपूर्ण टीमचा सन्मान आहे. परदेशामध्ये असलेल्या महागड्या उपचार पद्धतीचे भारतात संशोधन करून कमीत कमी खर्चामध्ये ती उपचार पद्धती करणे व देशातील क्लीनिकांद्वारे तिची उपयुक्तता सिद्ध करून जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. या थेरेपी मध्ये रुग्णाच्या शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणेच्या टी सेल या पेशी बाहेर काढून त्यांच्यामध्ये आवश्यक बदल केले जातात त्यानंतर या पेशी पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडल्या जातात त्यामुळे त्या कर्करोगाच्या पेशी ओळखून त्यांच्याशी लढण्यास सक्षम होतात पूर्वी ही पद्धती फक्त परदेशात उपलब्ध असल्याने आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींनाच तिचा लाभ घेता येत होता मात्र या भारतीय संशोधनामुळे तिचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता येणे शक्य होणार आहे.
– डॉ हसमुख जैन



