आपला जिल्हा

नगरपालिकेने उभे केलेले कवी अनंत फंदी नाट्यगृह अत्याधुनिक – अभिनेते सुबोध भावे

नगरपालिकेने उभे केलेले कवी अनंत फंदी नाट्यगृह अत्याधुनिक – अभिनेते सुबोध भावे

संगमनेरच्या अत्याधुनिक नाट्यगृहात नाट्य प्रयोग करण्यास प्राधान्य नगरपालिका पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
Kopargaon vijay kapse दि २७ नोव्हेंबर २०२६-तालुकास्तरावर अत्यंत अद्यावत व सुंदर नाट्यगृह संगमनेर नगर परिषदेने उभारले आहे. खरे तर नगराध्यक्ष व त्यांच्या सर्व टीमचे सर्वांनी कौतुक करणे गरजेचे असून यामुळे नाट्य चळवळीला प्रोत्साहन मिळणार असून आगामी काळामध्ये नव्या अत्याधुनिक कवी आनंद फंदी खुले नाट्यगृहामध्ये नाट्य प्रयोग करण्यास आपले प्राधान्य राहील असे गौरवउद्गार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी काढले आहे याचबरोबर नगरपालिकेच्या कामाचे त्यांनी कौतुक केले आहे.

जाहिरात
कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या 49 व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी प्रकट मुलाखत दिली यावेळी संगमनेर मधील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभिनेते सुबोध भावे म्हणाले की, नाटकाला दोनशे वर्षांची मोठी समृद्ध परंपरा पासून अनेक संकटे आली मात्र नाट्य चळवळ टिकून राहिली. मराठी माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत नाट्य चळवळ राहणार. सध्या एकआय चा जमाना आहे. तरीही नाटकाचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. संगमनेर मध्ये तर सांस्कृतिक कार्यक्रमांना कायम मोठा प्रेक्षक लाभत असतो.

जाहिरात

कभी अनंत फंदी खुले नाट्यगृह होते .त्यावेळेस आपण या ठिकाणी नाट्यप्रयोग केले आहे. परंतु आता नगरपालिकेने अत्यंत अत्याधुनिक आणि सुसज्ज नाट्यगृह उभारले असून तालुका स्तरावरील हे मोठे नाट्यगृह आहे.

प्रत्येक व्यक्तीला गावाला परिसराला एक स्वतःचा इतिहास असतो तो आपण जपला पाहिजे पुढच्या पिढ्यांना सांगण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. संगमनेर शहर व तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून राज्यभरात ओळखला जातो .संगमनेरने विकासातून समृद्धतेतून आपली ओळख राज्यात निर्माण केली आहे. संगमनेरला साहित्य कला व संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे. ती आपण जपली पाहिजे.

जाहिरात

येणाऱ्या काळामध्ये मुलाखती बरोबरच येथे नाट्य प्रयोग करायला आवडेल असेही त्यांनी सांगितले यावेळी नवीन अद्यावत असलेले कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह पूर्णपणे भरले होते. सुबोध भावे यांनी कवी अनंत फांदी नाट्यगृहाचा आवर्जून उल्लेख केल्या वेळी उपस्थित रसिकांनी टाळ्यांनी भरभरून दाद दिली.

नाट्यगृहाबाबत संगमनेरचे नागरिक व रसिक आनंदी

संगमनेर नगर परिषदेने लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्तेची तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले अत्याधुनिक नाट्यगृह ही अत्यंत सुसज्ज व अत्याधुनिक आहे.1000 आसन क्षमता व सर्व सोय युक्त असलेले हे नाट्यगृह सर्वांसाठी आनंद देणारे आहे. अनेक दिवसाच्या कामांमधून हे नाट्यगृह उभे राहिले असून सर्व नागरिक व रसिक आम्ही समाधानी आहोत यामध्ये कोणीही राजकारण करू नये सर्वसामान्य नागरिक आनंदी हेच सर्वात महत्त्वाचे असल्याची भावना उपस्थित शेकडो नागरिक व महिलांनी व्यक्त केली.

युवक व ज्येष्ठांची विविध ठिकाणी सेल्फी

अत्यंत दर्जेदार आणि अत्याधुनिक झालेले कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह हे सर्वांच्या कुतूहालाचा विषय ठरले आहे तालुका व शहरातील युवक युवती मोठ्या संख्येने नाट्यगृहाला भेट देत असून या झेन जी बरोबर ज्येष्ठ नागरिक ही विविध ठिकाणी सेल्फी ला प्राधान्य देत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे