विरोधकांसाठी आभाळ फाटले त्यामुळे त्यांनी थिगळ लावून पराभव झाकणार नाही : विवेकभैय्या कोल्हे
फैजल मन्सुरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १६ डिसेंबर २०२५–कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधील छत्रपती बॉईज ग्रुपचे अध्यक्ष फैजल मन्सुरी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी मा. आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला.
विवेक कोल्हे म्हणाले,या प्रभावी नेतृत्वांच्या पक्षप्रवेशामुळे कोपरगाव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, व्यापक जनसंपर्काचा व स्थानिक प्रभावाचा आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला निश्चितच मोठा फायदा होणार आहे. या माध्यमातून भाजपला राजकीय गती मिळून निर्णायक विजयाकडे वाटचाल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी सर्व नवप्रवेशितांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी दिलीपभाऊ दारुणकर, राजाभाऊ शिंदे, प्रशांत कडू, सोमनाथ मस्के, बाळासाहेब पवार, संपत चंदनशिव, भारतजी रोकडे, नवाब मन्सुरी, सलीमभाई मन्सुरी, असलम शेख, बंटी कांबळे, अल्ताफ पठाण, सलीम पठाण,रोहित कणगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.