आपला जिल्हा

कोपरगाव तालुक्यातील मनिष समुपदेशन केंद्र ठरताहेत वरदान

कोपरगाव तालुक्यातील मनिष समुपदेशन केंद्र ठरताहेत वरदान

कोपरगाव तालुक्यातील मनिष समुपदेशन केंद्र ठरताहेत वरदान

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑक्टोबर २०२५ -: पती पत्नी भांडण, सासु सुनेची भांडणे, हुंड्यावरुन भांडणे, व्यसनाधिनतेमुळे, संशयीवृत्तीमुळे, शारिरिक छळ, आर्थिक छळ, मानसिक छळ, लैंगिक शोषण, फसवणूक आणि कौंटुंबिक हिंसा, छळ, मारहाण अशा विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांचे मानसिक स्वास्थ बिघडते. अशावेळी महिलांना मानसिक उपचाराची सर्वाधिक गरज असते. महिलांच्या या मानसिक परिस्थितीची दखल घेत मनिष समुपदेशन केंद्राचा तालुक्यातील अनेक पीडित महिलांना फायदा होत आहे. त्यामुळे महिला समुपदेशन केंद्र महिलांसाठी वरदान ठरत आहेत.दिवसेंदिवस समाज शिक्षित व प्रगतिशील होत असला तरी महिलांवरील अत्याचार व शोषण वाढतच चालले आहे. प्रगत समाजाकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा केली जात असली, तरीही कौटूंबिक हिंसाचारामध्ये अशिक्षित कुटूंबापेक्षा शिक्षित कुटूंबाचे प्रमाण वाढत वाढत असून ही चिंतेची बाब आहे.शिक्षित महिलांनी कौटूंबिक हिंसाचार सहन न करता आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा, अत्याचाराचा विरोध सामंजस्याने करण्यासाठी महिला समुपदेशन केंद्रामध्ये जावून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. मार्गदर्शन घेवूनच पुढचे पाऊल उचलने महिलांसाठी महत्वाचे ठरणार आहे

जाहिरात

समुपदेशन केंद्रात येणाऱ्या प्रत्येक महिलेकडून तिच्या समस्येचा अर्ज लिहून घेतला जातो. एखाद्या महिलेस लिहीता वाचता येत नसेल तर, केंद्रावरील कर्मचारी तिची समस्या ऐकूण अर्ज लिहून घेतात. त्यानंतर, तिला कुटूंबातील कोणत्या व्यक्तीचा त्रास होतोय हे जाणून त्या व्यक्तीला केंद्रामार्फत बोलावले जाते त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितले जाते. ती व्यक्ती केंद्रात भेट देण्यास आली नाही तर, त्या महिलेला कायद्याची मदत दिली जाते. अनेकदा पती-पत्नींमधील भांडणाचे प्रकार हे शुल्लक असतात. त्यासाठी दोघांचे म्हणणे ऐकूण त्यांना मार्गदर्शन केले जाते. दोघांचे भांडण मिटविण्याचा आमचा प्रयत्न असतो.

जाहिरात

त्यांचा सहमतीने त्यांना सहा महिन्याचा वेळ दिला जातो. याकाळात, त्यांच नात कसे सुरु आहे याकडे आमचे लक्ष असते. त्यामुळे एखादे प्रकरण सोडवायला कधी तरी सहा महिने तर, कधी दोन वर्षे देखील लागतात, अशी प्रतिक्रिया मनिष समुपदेशन केंद्राचे सोमनाथ डफाळ यांनी दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे