आपला जिल्हा

निरीक्षक अजय कुमार बिष्ट यांनी केली अकोले तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी

निरीक्षक अजय कुमार बिष्ट यांनी केली अकोले तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी

मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या प्रशासनाला सूचना

जाहिरात

शिर्डी प्रतिनिधी दि ११ मे २०२४ – शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिष्ट यांनी आज अकोले विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राना भेटी दिल्या. अकोले तहसील येथे आयोजित बैठकीत निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.

जाहिरात

निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिष्ट यांनी अकोले तालुक्यातील दुमाळवाडी, टाकळी, ढोकरी या गावातील मतदान केंद्रांवरील सोयी – सुविधांची पाहणी केली. त्यांनतर अकोले तहसील येथे आयोजित बैठकीत अकोले विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला‌.

जाहिरात

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील रहावे. असा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने केलेल्या तयारीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. अकोले प्रशासनाच्या निवडणूक तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रामदास जगताप, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ मोरे, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे आदी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे