संवत्सर येथे पद्मश्री विखे पाटील जयंती उत्साहात साजरी
संवत्सर येथे पद्मश्री विखे पाटील जयंती उत्साहात साजरी
संवत्सर येथे पद्मश्री विखे पाटील जयंती उत्साहात साजरी
कोपरगाव विजय कापसे दि १९ ऑगस्ट २०२४-सहकार क्षेत्रातील कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची १२४ वी जयंती व शेतकरीदिन संवत्सर ग्रामपंचायत व नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना राजेश परजणे पाटील म्हणाले की, पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांनी भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी स्थापन करून सहकारी चळवळ सुरू करून शेतकऱ्यांच्या विकास योजना राबवण्याचे काम केले. त्यामुळे सहकार संस्थेस उत्तेजन मिळालेले आहे. शेतकरी दिनाचे महत्त्व विशद करताना परजणे पाटील यांनी पद्मश्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. शेतकऱ्यांचे हित जपण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यातून सहकारी चळवळीत समाजाच्या प्रत्येक घटकाचा समावेश होईल हेच भावी विशाल सहकारी जगताचे स्वप्न साकार होईल आणि ते आज साकार झालेले आहे असेही श्री राजेश परजणे पाटील म्हणाले.
प्रसंगी संवत्सर गावच्या सरपंच सुलोचना ढेपले ताई, उपसरपंच विवेक परजणे पाटील, कृषी अधिकारी कांबळे मॅडम, चंद्रकांत लोखंडे, दिलीपराव ढेपले, खंडू पाटील फेपाळे, सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव परजणे, लक्ष्मणराव साबळे, शिवाजीराव गायकवाड, अनिल आचारी, बाळासाहेब दहे, संदीप भाकरे, राजेंद्र निकम, शंकर नाना परजणे, अविनाश गायकवाड, बाळासाहेब भोसले तसेच कृष्णा अहिरे ग्रामविकास अधिकारी, प्राचार्य सदाफळ सर व ग्रामस्थ उपस्थित होते दिलीप ढेपले यांनी आभार मानले.