आपला जिल्हा

एस एस जी एम महाविद्यालयात विज्ञान व तंत्रज्ञानातील नवोन्मेषावर राष्ट्रीय परिषद

एस एस जी एम महाविद्यालयात विज्ञान व तंत्रज्ञानातील नवोन्मेषावर राष्ट्रीय परिषद

एस एस जी एम महाविद्यालयात विज्ञान व तंत्रज्ञानातील नवोन्मेषावर राष्ट्रीय परिषद

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ मार्च २०२६रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स कॉलेज (एस.एस.जी.एम. कॉलेज), संलग्नता – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, यांच्या वतीने “Advances in Cutting-Edge Research and Innovation in Science and Technology (ACRIST-2026)” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद दि. ५ व ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये (ऑफलाइन पद्धतीने) पार पडणार आहे.

जाहिरात

सदर परिषदेचे उद्घाटन  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे  कुलगुरू मा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या परिषदेचे मुख्य अतिथी म्हणून स्वामी रामनद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. पंडित विद्यासागर उपस्थित राहणार आहेत.  सदर परिषदेत  मटेरियल्स अभियांत्रिकी विभाग, भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील  मा. डॉ. सचिन रोंदिया,  द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई येथील मा. डॉ. युवराज मालघे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख मा. डॉ. संदेश जाडकर, एम. जी. व्ही. एल. महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथील गणित  विभागप्रमुख, मा. डॉ. वसंत निकम, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्राध्यापक  मा. डॉ. संतोष शिंदे, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र येथील स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेसचे माजी संचालक मा. डॉ. सुभाष बेंद्रे, आयडियल टेक इन्फो, नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. प्रांजल चित्ते, इंटेलेक्च्युअल प्लॅटफॉर्म, मुंबईचे संस्थापक, मोरे अँड कदम लीगल असोसिएट्सचे भागीदार  मा. पराग मोरे, हे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेच्या समारोप सत्रासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष  मा. अॅड. भगीरथ शिंदे हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत.

जाहिरात

या परिषदेत देशभरातील प्राध्यापक, संशोधक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थी यांना आपले संशोधन सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. खालील लिंकवर क्लिक करून परिषदेत  आपला सहभाग नोंदवावा.सहभाग नोंदविण्याची लिंक – https://forms.gle/3j29jygY1Q6VSv6eA

पेपर पाठविण्यासाठी मेल आय डी-  acerist.conf.ssgmck2026@gmail.com

Whats up Group- https://chat.whatsapp.com/FRerae9N5ccGdlrb47fzV2?mode=gi_t 

जाहिरात

तरी जास्तीत जास्त विषयतज्ञ व  अभ्यासकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे