शहर पोलिस कोपरगाव
निर्दयीपणे जनावरे वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
निर्दयीपणे जनावरे वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
निर्दयीपणे जनावरे वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
कोपरगाव विजय कापसे दि २६ ऑक्टोबर २०२४– कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका ४०७ टेंपो मध्ये तिघेजण अत्यंत निर्दयीपणे ८ बैल (जनावरे) वाहतूक करत असताना मिळून आले असता त्या तिघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये जनावरे निर्दयीपणे विनापरवाना वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शनिवार दि २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्ग जवळून आरोपी आनंद विष्णू मोकळे राहणार आडगाव सरक, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, गोरक्षनाथ शेषराव पठाडे राहणार बोरवाडी जिल्हा छत्रपती संभाजीनगर व शहा अशक अली बिस्मिल्ला राहणार आडगाव सरक, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे त्यांच्या ताब्यातील ४०७ टेम्पोमध्ये (एम.एच ०४ इ बी ३२०१) मध्ये वाहतुकीबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कोणतेही प्रमाणपत्र न घेता आपल्या वाहनांमध्ये बैलांसाठी कुठल्याही प्रकारे मॅटिंग न टाकता तसेच सदर प्राणी वाहतुकी संबधी कुठलाही परवाना नसताना त्यांच्या मालकीच्या वाहनांमध्ये गोवंश जातीचे ८ जनावरे बैल अत्यंत निर्दयीपणे त्यांना वेदना होतील अशा पद्धतीने दाटी-वाटी करून विनापरवाना वाहतूक करताना मिळून आले असता वरील तिन्ही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती मुंबईचे आशिष कमलकांत बारीक यांच्या फिर्यादीनुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये ४९८/२०२४ प्राण्यास निर्दयीपणे वागवणे कलम ११ (१) (अ) (ड) (इ) (फ) सह महा.पोलीस अधिनियम क-११९ सह केंद्रीय वाहतूक कायदा कलम ११५ (ई) महा वाहतूक कायदा कलम १३०/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर जाधव हे करत आहे.
तर आरोपीकडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे ८ गोवंश बैल (जनावरे) तर २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा ४०७ टेम्पो असा ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिस निरीक्षक मथुरे यांनी सर्वांना आवाहन केले की सर्वांनी रस्ते वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा पोलिसाच्या कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.