शहर पोलिस कोपरगाव

कोपरगावात गावठी दारू विकणाऱ्यावर तसेच जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांची कारवाई 

कोपरगावात गावठी दारू विकणाऱ्यावर तसेच जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांची कारवाई 

कोपरगावात गावठी दारू विकणाऱ्यावर तसेच जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांची कारवाई

कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑक्टोबर २०२४कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक विनाअडथळा शांततेत व्हावी याकरिता कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्या वर लक्ष केंद्रित करत मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली असून दोनदिवसांपूर्वीच गावठी हातभट्टी चा अड्डा नष्ट केल्यानंतर आज  कोपरगाव शहरात बेकायदेशीर रित्या गावठी दारू विकणाऱ्या  आरोपीवर तसेच जुगार अड्ड्यावर कारवाई केल्याने शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस कॉन्स्टेबल सुशील शिंदे यांनी शहर पोलिस  स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार शाम किसन मंजुळ राहणार महादेवनगर  कोपरगाव हा कोपरगाव  शहरातील महादेव नगर येथील घराच्या भिंतीच्या आडोशाला बुधवार दिनांक  २३ ऑक्टोबर रोजी दुपारी  १.५० वाजण्याच्या सुमारास विनापरवाना बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असताना मिळून आला असता त्याच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये ४४८/२०२४ नुसार मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांनी सुमारे ९ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची ९० लिटर दारू नष्ट केली असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बी.एस कोरेकर हे करत आहे.

जाहिरात
तर दुसऱ्या गुन्ह्यात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश काठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टाकळी येथील ज्ञानेश्वर रमेश आहेर हा आरोपी बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३५ वाजण्याच्या सुमारास टाकळी गावात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ लोकांकडून पैसे घेऊन त्यांना  कल्याण मटका जुगाराचे आकडे चिठ्ठ्यावर लिहून देऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवत असताना मिळून आला असता त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये कल्याण मटका नावाचा जुगार खेळणे या गुन्ह्याखाली गुन्हा रजिस्टर नंबर ४९०/२०२३ मोजूका १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून २ हजार २१० रुपये रोख व मटक्याचे साहित्य जमा करण्यात आले असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आर.पी.पुंड हे करत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे