शहर पोलिस कोपरगाव

अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवणाऱ्या आरोपीसह नातेवाईकांना केले जेरबंद 

अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवणाऱ्या आरोपीसह नातेवाईकांना केले जेरबंद 
अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवणाऱ्या आरोपीसह नातेवाईकांना केले जेरबंद 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ नोव्हेंबर २०२४कोपरगाव येथील एका ४७ वर्षीय फिर्यादीने सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादी नुसार, त्याची अल्पवयीन मुलगी वय १४ वर्ष हिस त्याचे रहाते घराजवळुन कोणीतरी अज्ञात इसमाने पळवुन नेले आहे यावरुन  कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर  ४८३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके हे सदर अल्पवीन मुलींचा तांत्रिक  विश्लेशनाद्वारे शोध घेत असताना ती मुलगी रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी मिळुन आली असता त्या अल्पवयीन मुलीची अधिकची चौकशी करत तिचा जबाब नोदवुन तिच्या जबाबावरुन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल  सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८७,६४(२) (आय), (एम), ६५ (१), ४६ लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनीयम २०१२ चे कलम ४,८,१२,१७ प्रमाणे वाढ केली आहे.

जाहिरात
तर सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी आरोपी वैभव संजय लोखंडे वय २० वर्ष रा. खडकी ता. कोपरगाव याने सदरची मुलगी ही अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेवुन तिला लग्नाचे आमिष दाखवुन पळवून नेले. अल्पवयीन मुलगी वय १४ वर्ष हिस आरोपी वैभव लोखंडे हा पळवुन घेवुन गेला असताना त्याची आई मंगल संजय लोखंडे रा. खडकी, मेहुना नितीन कैलास समींदर, बहीन अर्चना समींदर रा. वैजापुर यांनी सदरची मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असुन देखील त्याबाबत पोलीस प्रशासनाला तसेच मुलीचे नातेवाईक यांना कोणत्याही प्रकारे माहीती दिली नाही व आरोपी वैभव लोखंडे यास पळुन जाण्यास मदत केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले झाल्याने सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्यास मदत करणारे त्याचे नातेवाईक यांना पोलिसांनी अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड करीता मा. विशेष तथा अति. जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव यांचे समक्ष हजर केले असता त्यांना न्यायालयाने  पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

जाहिरात
सदरची कौतुकास्पद कामगिरी ही अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी  उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके, किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक भुषण हंडोरे, संजय पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल दिपक रोकडे, पोलिस कॉन्स्टेबल धोंगडे, कानवडे, भांगरे, काकडे, सुंबे, बनकर, दिवे, भांगरे, त्रिभुवन यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके, रायटर पोलिस हेड कॉन्स्टेबल दिपक रोकडे हे करीत आहेत.

काल्पनिक चित्र

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे