रेनबो स्कूल

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये “शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा” उत्साहात संपन्न

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये “शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा” उत्साहात संपन्न

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये “शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा” उत्साहात संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ मार्च २०२४– “शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठान व रेनबो इंटरनॅशनल स्कूल” आयोजित गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ – २५ ही रविवार, दि.१७ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत अतिशय प्रसन्न वातावरणात व विद्यार्थ्यांच्या सळाळत्या उत्साहात संपन्न झाली. कोपरगाव शहर व पंचक्रोशीतील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी आजच्या परीक्षेसाठी आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. यामध्ये कोपरगाव, पोहेगाव, कुंभारी,कोकमठाण, शिर्डी कोळपेवाडी, माहेगाव,चांदेकसारे, शिंगवे आणि पुणतांबा या गावातील विविध शाळेमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी या गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपस्थित होते.

जाहिरात

विद्यार्थीदशेत झेप किती मोठी होते, हे उपलब्ध होणाऱ्या संधीवर ठरत असते. ग्रामीण भागात असे अनेक टॅलेंट मोठ्या प्रमाणावर दडलेले आहेत. त्यांना शोधणे आणि पोषक संधीची कवाडे खुली करणे, हे अण्णांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांचा हाच प्रेरणादायी विचार पुढे प्रवाही ठेवण्यासाठी संस्थेचे सचिव संजय नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक व प्राचार्य  आकाशजी नागरे हे अव्याहातपणे कार्यरत आहेत.

जाहिरात

समाजाप्रती असलेले आपले ऋण फेडण्याच्या सामाजिक बांधिलकीतून गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेला हा स्तुत्य उपक्रम पालकांच्या कौतुकास्पद ठरलेला आहे. दरवर्षी याला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी, सहावी,सातवी व आठवीच्या वर्गांसाठी गुणवत्ता यादीतील अनुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून इयत्ता दहावी पर्यंतचे रेनबो इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव यांची मोफत शिक्षणासाठीची गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

शाळेचा प्रसन्न व निसर्गरम्य परिसर बघून विद्यार्थी व पालक भारावून गेले. परीक्षेचे आयोजन अतिशय उत्कृष्टपणे करण्यात आले होते. बैठक व्यवस्था अतिशय प्रशस्त असल्याने विद्यार्थ्यांना कंटाळा आला नाही. त्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था जागेवरच करण्यात आलेली होती. परीक्षे दरम्यान स्वतः  संजय नागरे व  आकाश नागरे परीक्षा हॉलमध्ये येऊन आढावा घेत होते.
गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशस्वीतेसाठी, शैक्षणिक संचालक  नानासाहेब दवंगे, उपप्राचार्य  निलेश औताडे व कार्यालयीन प्रमुख  रवींद्र साबळे यांचे उत्तम नियोजन तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले. लवकरच या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात येणार आहे. आणि तो पालकांना कळविण्यात येणार आहे. परीक्षा संपल्यानंतर पालकांनी रेनबो स्कूलच्या या अभिनव उपक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना कौतुकास्पद उद्गार काढले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे