रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न
रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न
रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १५ जुलै २०२४– लोकशाही सुदृढ करायची असेल, तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज आहे. त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते. शालेय शिक्षणात नागरिक शास्त्र शिकवलं जातं, पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिकशास्त्र शिकवण्याचा यशस्वी प्रयोग शिक्षणमहर्षी स्व. लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी या शाळेत केला जात आहे. नुकतेच शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ यासाठी विद्यार्थी परिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये गुप्त मतदान पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.आणि नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
याच नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथ व पदग्रहण सोहळा शनिवार दि. ६ जुलै रोजी रेनबो शैक्षणिक संकुलात थाटात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी विश्वस्त आनंद दगडे, संस्थेचे सचिव संजय नागरे, कार्यकारी संचालक आकाश नागरे, शैक्षणिक संचालक नानासाहेब दवंगे, उपप्राचार्य निलेश औताडे, कार्यालयीन प्रमुख रवींद्र साबळे आदी सह सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रमुख अतिथींचे स्वागत विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विद्यार्थी परिषद कार्यकारिणीतील नवनियुक्त सदस्यांना मा. आनंदजी दगडे सरांच्या हस्ते बॅचेस व ध्वज देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये, नैतिक निलेश निकुंभ ( स्कूल स्टुडन्टस रिप्रेझेंटेटिव्ह ), कु.धनश्री मनोज कदम( हेड गर्ल ), वंश वीरेंद्र जैन ( व्हॉइस हेड बॉय ), कु.अक्षिता विरेश बडजाते ( व्हॉइस हेड गर्ल ), कु. श्रद्धा दीपक वक्ते ( व्हॉइस अकेडेमिक कॅप्टन ), कु. अदिती गणेश पानसरे ( डीसिप्लिन कॅप्टन ), सोहम कमलेश लोढा ( व्हॉइस डिसिप्लिन कॅप्टन ), साई नवनाथ सोनवणे (स्पोर्ट्स कॅप्टन), कु.भक्ती बाबासाहेब पानगव्हाणे (व्हाईस स्पोर्टस कॅप्टन), कु.आर्यश्री विनायक पंडोरे( कल्चरल कॅप्टन ), कु.अंजली अनिल शिंदे( व्हॉइस कल्चरल कॅप्टन ), सुदर्शन विजय घुले ( रेड रोवर्स कॅप्टन ),कु. सई प्रशांत सूर्यवंशी( ग्रीन डॅजलर्स कॅप्टन), आदित्य संदीप दौंगे (ब्लू टायटन्स कॅप्टन / हेड प्रिफेट ), वेदांत दीपक वक्ते( येलो थंडर्स कॅप्टन) या विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्व नवनियुक्त कार्यकारणीच्या सदस्यांना संगीता काळे मॅडम यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. विद्यार्थी प्रतिनिधींनी आपली मते मांडताना आमच्यावर सोपवलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून आमचे कर्तव्य योग्य रीतीने पार पाडू असे आश्वासन दिले. तसेच,याप्रसंगी मागील वर्षीच्या विद्यार्थी कार्यकारिणीचे मावळते सदस्य कु. पलक ठक्कर, कु. गार्गी दळवी, कु. आदिती घुले, कु. वैष्णवी गव्हाणे, शिवम सातपुते, सार्थक वाघ, देवराज देशमुख व यशराज वक्ते यांनी सबंध वर्षभर शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दवंगे सर म्हणाले, शालेय जीवनात ज्ञानार्जन करीत प्रगतीच्या शिखराकडे जात असताना यशाचे अनेक उंबरठे नेत्रदीपक गुणवत्तेने पार करावेत. परंतु त्याच सोबत स्वयंशिस्त, सामाजिक नीतिमूल्य, नैतिकता व आदर्शाचे वास्तव धडे देखील घेतले पाहिजेत. यातूनच परिपूर्ण व्यक्तिमत्व घडत असतं. कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना श्री निलेश औताडे सर म्हणाले की, स्व. अण्णांच्या स्फूर्तीदायी व प्रेरणादायी विचारधारेवरच रेनबो शैक्षणिक संकुलाची यशस्वी वाटचाल चालू आहे. आजचा हा नेत्रदीपक सोहळा त्याचीच परिणीती आहे.त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनाही धन्यवाद दिले. संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल अग्रवाल, विश्वस्त मनोज अग्रवाल, आनंद दगडे , वनिताताई नागरे आदी पदाधिकाऱ्यांनी शालेय मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षक जी. एम. पगारे व मि. पॉल यांनी केले.