आत्मा मलिक हॉस्पिटल

ओलंपियाड परीक्षेत आत्मा मालिकचा विश्वजीत देवकर देशात प्रथम

ओलंपियाड परीक्षेत आत्मा मालिकचा विश्वजीत देवकर देशात प्रथम

आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

कोपरगाव विजय कापसे दि २६ मार्च २०२४कोपरगांव  सिल्वर झोन ओलंपियाड फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय तर्क आणि अभियोग्यता ओलंपियाड या परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे ही परीक्षा इयत्ता दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते.

जाहिरात

या ओलंपियाड परीक्षेवर सीबीएससी व स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यम या माध्यमाच्या शाळांचे वर्चस्व असतते परंतु आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाच्या सेमी इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थ्याने या सर्व गोष्टीवर मात करत देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. झोनल टॉपर दोन विद्यार्थी, गोड मेडल तीन विद्यार्थी, सिल्वर मेडल तीन विद्यार्थी, ब्राँझ  मेडल तेरा  विद्यार्थी, विशेष प्राविण्य प्राप्त ३९ विद्यार्थी, ऑल इंडिया रँक ५० – ७१ विद्यार्थी असे एकूण ५९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. असे प्राचार्य निरंजन डांगे सर यांनी सांगितले.

जाहिरात

यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये देशात प्रथम क्रमांक देवकर विश्वजीत, झोनल टॉपर (चार राज्य मधून) तृतीय क्रमांक नलावडे श्रेयश व पुरकर सुरज. गोल्ड मेडल प्राप्त नागरगोजे पृथ्वीराज, ढोरकुले ओम, लोखंडे अविराज. सिल्वर मेडल प्राप्त इंगोले श्रीतेज, टकले पुष्पराज, मोरे हर्षद. ब्रांच मेडल प्राप्त शिंदे शंतनू, कारंडे ऋतुराज, लगड अनुभव, बागुल नयन, हासे यश, जाधव रितेश, पालवे सुदर्शन, पाटील केतन,  जेजुरकर सोहम, शिंदे अभिनव, थोरात मल्हार. विशेष प्राविण्य प्राप्त शिंदे तनिष्क, हुले अदिती, सोनवणे ईश्वर, आहेर अथर्व, बोडके श्रावण, चव्हाण कृष्णा, ढवळे साई, नलावडे भूषण, निकम आदित्य, पाटील पुष्पराज, पवार विपुल, टेंगळे छत्रसाल, शिंदे सुयश, उंडे हर्षवर्धन, जोर्वेकर तन्मय, हसे राज, बादाडे प्रणव, घोगरे प्रसाद, भवर श्रेयश, राजपूत उत्कर्ष, बोडके कार्तिक, झिंजुर्के श्रीनाथ, लटपटे समीक्षा, महामीने अर्चित, राऊत श्रद्धा, सोनवणे यश, कदम तन्मय, नहीरे  मयंक, नवले ऋग्वेद, त्र्यंबके विश्वजीत, पाटील चैतन्य, पाटील धीरज, पगारे सिद्धार्थ, लोहकने वरद,  जपे संगम निकम विवेक, मोहिते अभय, रोकडे तन्मय, पाटील पियुष या विद्यार्थांचा समावेश आहे.

जाहिरात

या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे सर विभाग प्रमुख सचिन डांगे अथर्व फाउंडेशनचे नंदकिशोर भाटे,राहुल मिश्रा  , शिवम तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक, सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदीनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे