श्री राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भागवत कथेचे आयोजन-ह.भ.प संगीता महाराज चव्हाण
श्री राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भागवत कथेचे आयोजन-ह.भ.प संगीता महाराज चव्हाण
कोपरगाव वैजापूर रस्त्यालगत नऊचारी परिसरात अत्यंत देखणे मंदिर साकारले आहे
कोपरगाव विजय कापसे दि २९ मार्च २०२४–राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजा महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, कुंभार गुरूजी, गुरुवर्य सोपानकाका करंजीकर, ह.भ.प यशवंत महाराज मुटेकर अशा अनेक साधुमंतांच्या कृपाशीर्वादाने कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर नऊचारी येथे श्री राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भागवताचार्य ह.भ.प मनसुख महाराज दहे यांच्या मधुर वाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ह.भ.प संगीता महाराज चव्हाण यांनी दिली आहे.
कोपरगाव वैजापूर रस्त्या लगत नऊ चारी परिसरात ज्ञानाई गोशाळा अंतर्गत अनेक दानशूर भाविक भक्तांच्या मदतीने भव्य दिव्य असे मंदिर उभे राहिले असून या मंदिरात श्री राधाकृष्ण च्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पु रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते बुधवार १३ एप्रिल रोजी होणार असून या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित भागवत कथेचा ध्वजारोहण समारंभ सोमवारी ८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता श्रीक्षेत्र कुंभारी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ राघवेश्वरनंदगिरीजी महाराज व मळेगाव थडी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत कैलासनंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व अनेक भाविक भक्ताच्या उपस्थित होणार आहे.
तसेच सोमवार दि ८ एप्रिल २०२४ ते रविवार दि १४ एप्रिल २०२४ या कालावधीत दररोज रात्री ८ ते १० या वेळेत संगीतमय भागवत कथा संपन्न होणार असून सोमवार दि १५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री विठ्ठल आश्रम गंगापूर यांचे काल्याचे किर्तन होऊन उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी श्री राधाकृष्ण मूर्ती प्रांणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त आयोजित संगीतमय भागवत कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानाई गोशाळेच्या ह.भ.प संगीता ₹महाराज चव्हाण यांनी केले आहे.