अँड.नितीन पोळ

वाकचौरे,लोखंडे यांच्या उमेदवारीने निवडणूक सोपी झाली – ॲड नितीन पोळ

वाकचौरे,लोखंडे यांच्या उमेदवारीने निवडणूक सोपी झाली – ॲड नितीन पोळ

ॲड नितीन पोळ शिर्डी लोकसभा मतदार संघातून करणार उमेदवारी

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २९ मार्च २०२४शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक सोपी झाली आहे.

जाहिरात

भाऊसाहेब वाकचौरे सण २००९ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना पराभूत करून मोठ्या मताधिक्याने निवडून आले मात्र त्यानंतर राजकीय दिशा न समजल्या मुळे सातत्याने काँग्रेस भाजप आणि पुन्हा आता उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले असले तरी मागील दहा वर्षातील त्यांचा राजकीय प्रवास पाहता मतदार संघाचे विकासा पेक्षा त्यांना त्यांचा स्वतःचा विकास महत्वाचा वाटत आहे त्यामुळे त्यांना पक्षांतर्गत विरोधक व बहुसंख्य नाराज मतदारांचा सामना करावा लागणार आहे.

जाहिरात

या उलट २०१४ साली मोदी लाटेवर स्वार झालेल्या सदाशिव लोखंडे यांना जनतेने मतदार संघातून पुरेशी ओळख नसताना बहूसंख्य मताधिक्याने निवडून दिले मात्र निवडून गेल्यावर पाच वर्षे मतदार संघातील जनतेला तोंड न दाखवता ते थेट २०१९ मध्ये निवडणुकीत दिसू लागले असे असले तरी जनतेने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली मात्र मागील पाच वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न न करता या मतदार संघातील जनता किती भोळी आहे त्यांना आपल्या शिवाय पर्याय नाही असे समजून पुन्हा एकदा जनतेकडे पाठ फिरवली तसेच थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला मात्र मागील तीन चार महिन्यात उमेदवारी साठी प्रयत्न करत असताना अनेक अडथळ्यांचा सामना करत उमेदवारी पदरात पडली तरी मागील दहा वर्षात जनतेचाच काय पण पक्षातील कार्यकर्त्यांचा विकास काय पण विकार सुद्धा केला नाही असे असले तरी निवडणुकीला सामोरे जात आहे.
शिर्डी मतदार संघ अनुसूचीत जाती साठी राखीव असल्यामुळे राजकीय नेत्याचे अनेक गट अटीतटीचा सामना करत असतात मात्र आंबेडकरी मताची नाराजी शेती शेतकरी कष्टकरी यांची नाराजी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोक सभेत प्रस्थापित नेत्याना पद्धतशीर नारळ देणारी जनता या मतदार संघात असून सण २००९,२०१४ या लोक सभा निवडणुकीत जनतेने दाखवुन दिले असुन आगामी लोकसभा निवडणुकीत याची उत्सुकता असली तरी सर्व सामान्य जनतेचा विश्वास आणि प्रेम यांच्या जोरावर आगामी लोकसभा निवडणुक सोपी झाली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे