मंजूर येथून लाख रुपयेचा गांजा पोलिसांनी केला हस्तगत
पोलिसांनी केली मोठी कारवाई
कोपरगाव विजय कापसे दि १ एप्रिल २०२४– पोलिस पथकाने रविवारी कोपरगाव तालुक्यातील मंजूर या गावातून एका घरातून विक्री करण्यासाठी बाळगून ठेवला असलेला एक लाख रुपेयचा गांजा हस्तगत करत आरोपीला ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील प्रदीप बाजीराव पायमोडे यांच्या मंजूर येथील राहत्या घरी रविवार दि ३१ मार्च रोजी पोलिस पथकाने टाकलेल्या धाडीत विनापरवाना १ लाख ६ हजार १०० रुपये किमतीचा १० किलो ६१० ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ (गांजा) विक्री करण्याच्या दृष्टीने एका गोणी मध्ये ठेवल्याचा पोलिसांना मिळून आला असता प्रदीप बाजीराव पायमोडे या आरोपी विरुद्ध कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादी नुसार ११५/२०२४ गुंगीकारक औषधीद्रवे आणि मनोध्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क) , २० (ब) || प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ग्रामीण पोलिस निरीक्षक संदीप कोळी हे करत आहे.