संजीवनी शैक्षणिक संस्था

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ९ अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ९ अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड

   स्ट्रक्चरल इंजिनिअरींगच्या पहिल्या बॅचची दमदार वाटचाल

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १७ एप्रिल २०२४संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने २०२०-२१ मध्ये स्वायत्त संस्थेच्या दर्जाचा फायदा घेत स्ट्रक्चरल इंजिनिअरींग ही पूल, उड्डाणपूल, धरणे, इमारती, स्टेडियम आणि बोगदे तसेच ऑफशोअर, इत्यादींचे वैशिष्ट्यपूर्ण आधुनिक अभियांत्रिकी शिक्षण  देण्यासाठी  स्ट्रक्चरल इंजिनिअरींग ही नवीन शाखा सुरू केली. या शाखेची पहिली बॅच सध्या अंतिम वर्षात आहे. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी ) विभागाच्या प्रयत्नाने टेक्निक्स इंजिनिअरींग सर्व्हिसेस कंपनीने ४, रेसी इंजिनिअरींग कंपनीने २, डेल्टाकॉम स्ट्रक्चरल कन्सलटन्सीने १, सिव्हिल टेक कंपनीने १ व पिलर्स कन्सलटन्सी केपनीने १, अशा  नऊ नवोदित अभियंत्यांची  त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकऱ्यांसाठी  निवड केली आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

जाहिरात

             टेक्निक्स इंजिनिअरींग सर्व्हिसेस कंपनीने ऋतुजा आबासाहेब गव्हाणे, ऋतुजा अनिल गिरमे, ऋतिका सोमनाथ जाधव  व राऊ नविन डोहाळे यांची निवड केली आहे. रेसी इंजिनिअरींग कंपनीने सानिया शाहिद शेख व संकेत रमेश साबळे यांची निवड केली आहे. डेल्टाकॉम स्ट्रक्चरल कन्सलटन्सीने तेजल विश्वास  सोनवणे, सिव्हिल टेक कंपनीने युक्ता अजय वाणी व पिलर्स कन्सलटींग इंजिनिअर्स कंपनीने अनुराग प्रशांत पगारची निवड केली आहे. अशा  प्रकारे स्ट्रक्चरल इंजिनिअरींगच्या पहिल्या बॅचच्या नवोदित अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी  दमदार वाटचाल चालु आहे.

जाहिरात

          संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व नवोदित अभियंत्यांचे, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. ए. एस. सय्यद, टी अँड पी  विभागाचे डीन डॉ. विशाल तिडके यांचे अभिनंदन केले आहे.

    मी कोपरगावचीच असुन माझी घरची आर्थिक परीस्थिती सर्व साधारण होती. परंतु आई वडीलांनी मला जिध्दीने शिकविले. स्ट्रक्चरल इंजिनिअरींग ही पदवी पातळीवर तशी  नव्याने उदयाला आलेली ब्रॅन्च. म्हणुन मी इंतर पारंपारीक शाखा  न निवडता नविन काहीतरी शिकावे  म्हणुन स्ट्रक्चरल इंजिनिअरींग ही शाखा  निवडली. या शाखेचे  विविध सॉफ्टवेअर्स महागडे असतात, परंतु संजीवनीने सर्व सॉफ्टवेअर्स उपलब्ध करून आम्हाला परीपुर्ण केले. तसेच संशोधन  कार्याची आवड निर्माण केली. महाविद्यालयीन जीवनातच माझ्या एका संशोधन कार्याची मी पेटेंट मिळविण्यासाठी आवश्यक  ती प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि माझ्या संशोधन  कार्यास लवकरच मला पेटेंट मिळेल अशी आशा  आहे. आमच्या टी अँड  पी विभागानेही माझी मुलाखतीची चांगली तयारी करून घेतली. या सर्व बाबींमुळे  माझी टेक्निक्स इंजिनिअरींग सर्व्हिसेस मध्ये सहज निवड झाली. माझे व माझ्या आई वडीलांचे मी नोकरदार होण्याचे स्वप्न संजीवनीने पुर्ण केले, याचा मला अभिमान आहे.-विद्यार्थिनी ऋतुजा गिरमे.  

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे