सातभाई कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
सातभाई कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
विज्ञान विभागाचा ८३.३३% तर एम.सी.व्ही.सी विभागाचा ६९.५६%
कोपरगाव विजय कापसे दि २१ मे २०२४– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ तर्फे फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील कासली येथील कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान विभागाचा ८३.३३ तर एम.सी.व्ही.सी बिल्डिंग मेंटेनन्स विभागाचा ६९.५६% टक्के निकाल लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा महाविद्यालयाने कायम ठेवली असल्याचे संस्थापक अध्यक्ष परशरम साबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
सातभाई महाविद्यालयातुन विज्ञान विभागात एकूण १८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यांच्यापैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात प्रथम क्रमांक वैभव सुभाष घोटेकर (६०%) द्वितीय क्रमांक गौरव विकास कंत्रोड (५२.३३%) तृत्तीय क्रमांक अनिकेत संपत नरोडे (४९.८३) तसेच प्रज्ञा सुभाष गुरसळ, ओम भगवान ढाका, चेतन योगेश संत, पार्थ दगडू वहाडणे, प्रथमेश बाळासाहेब शिंदे, सोहनसिंग सुखदेवसिंग शेंबी, राहुल भानुदास वायकर, निखिल अण्णासाहेब गमे, निखिल प्रभाकर संवत्सरकर, साई संतोष घोटेकर, गौरव गणेश साबळे, स्वानंद सुरेश वासपुते विसपुते, हे विद्यार्थी यशस्वी झाले आहे.
तर एम.सी.व्ही.सी बिल्डिंग मेंटेनन्स विभागात २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यात १६ विद्यार्थी यशस्वी झालेअसून प्रथम क्रमांक दूशिंग सायली आण्णासाहेब (५८.५०) द्वितीय क्रमांक जाधव पूजा भास्कर (५८.३३) तृत्तीय क्रमांक काळे मयूर रविंद्र (५७.३३) चांदगुडे संकेत अशोक, कदम पांडुरंग आण्णा, गोरे आयुष शरद, बडवर समाधान रवींद्र, जाधव नम्रता रवींद्र, चव्हाण संगीता भागिनाथ, त्रिभुवन अमोल वाल्मीक, व्यवहारे सुनीता रमेश, पवार सिद्धार्थ राजेंद्र, लोणारे किरण बाळू, पिंगळे प्रथमेश रत्नाकर, पगारे हर्षद भाऊसाहेब, साबळे रवींद्र रामनाथ हे विद्यार्थी यशस्वी झाले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, रजिस्टार बापूसाहेब डांगे, प्राचार्य विशाल धारणगावकर, विजय जाधव, जनार्दन सुपेकर, सोनाली कापसे, संपदा चरमळ, रेखा दिवे, निलेश देवकर आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.