के जे सोमय्या कॉलेज

के . बी . रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम 

के . बी . रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम 

के . बी . रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ मे २०२४पुणे विभागीय  माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी/ मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून  कोपरगाव तालुक्यातील चासनळी   येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी  बोर्ड परीक्षेचा निकाल उत्कृष्ट  लागला आहे.

जाहिरात

     महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. विज्ञान शाखेत गाढे  आर्यन नितीन  ७३.१७ टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे. बारे आदित्य योगेश ७२.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.याने गणित विषयात ९६ गुण मिळवले.कुमारी चांदगुडे श्रावणी सुनील ७०.६७ टक्के गुण मिळवून  तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली  आहे.

जाहिरात

 वाणिज्य शाखेत वाघ गोकर्ण राजेंद्र ७६.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.  कुमारी वाघ रेणुका रवींद्र हिने ७६.१७ द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच कुमारी   शिंदे अश्विनी संतोष ७५.१७ टक्के गुण मिळवून  तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

जाहिरात

   यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,सचिव संजीव कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, संदीपराव रोहमारे, सुजितराव रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव,सचिन चांदगुडे,मनेष गाडे   पंडितराव चांदगुडे डॉ. विकास जामदार, रामभाऊ गाढे. चासनळी  महाविद्यालयाचे प्राचार्य. बारे एन. जी. आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे