संजीवनी शैक्षणिक संस्था

संजीवनी ज्यु.कॉलेजची तनुजा आंग्रे  कॉमर्स विभागात तर  सायन्स विभागात अंजली चोळके तालुक्यात सर्व प्रथम   

संजीवनी ज्यु.कॉलेजची तनुजा आंग्रे  कॉमर्स विभागात तर  सायन्स विभागात अंजली चोळके तालुक्यात सर्व प्रथम   

संजीवनी ज्यु.कॉलेजची तनुजा आंग्रे इ.१२ वीत कॉमर्स विभागात ९५ टक्के गुण मिळवून तालुक्यात सर्व प्रथम,  सायन्स विभागात अंजली चोळके ९२. ३३ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम   


    १०० टक्के 
 निकालाची   परंपरा कायम

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि २२ मे २०२४: महाराष्ट्र  राज्य उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रवारी मार्च मध्ये घेतलेल्या इ. १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहिर झाले असुन यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स व कॉमर्स विभागांचा निकाल १०० टक्के लागला असुन सलग ९ व्या  वर्षीही १०० टक्के  निकालाची परंपरा कॉलेजने राखली आहे. कॉमर्स विभागात तनुजा संजय आंग्रे हीने ९५ टक्के गुण मिळवुन कोपरगाव तालुक्यात सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला तर सायन्स विभागात अंजली सतीश चोळके हीने ९२. ३३ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला, अशी  माहिती संजीवनी ज्युनिअर कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

      पत्रकात पुढे म्हटले आहे की कॉमर्स विभागात अस्मिता केदारनाथ काब्रा हीने ९३. ३३ टक्के तर उत्सवी संदीप देवकर हीने ९३. १७ टक्के गुण मिळवनु अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. सायन्स विभागात साक्षी गणेश शिंदे  हीने ८६. ५० टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांकाने उत्तिर्ण झाली. ईश्वरी शरद गाडे ही ८६ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाची  मानकरी ठरली.

जाहिरात

सायन्स विभागातुन एकुण २९५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ९० टक्यांपेक्षा   एकाने अधिक गुण मिळविले. ८० ते ८९ टक्यांमध्ये १३ विद्यार्थी व ७० ते ७९ टक्यांमध्ये ५० विद्यार्थी उत्तिर्ण झाले. कॉमर्स विभागातुन ८३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ३० विद्यार्थ्यांनी ८० ते ८९ टक्यांमध्ये गुण मिळविले तर ७० ते ७९ टक्यांमध्ये २६ विद्यार्थी आहेत. तनुजा आंग्रे हीने बुक किपींग अँड  अकौंटन्सी विषयात १००  पैकी १०० गुण मिळविले. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात तनुजा प्रमोद उंडे, साक्षी परशराम शिंदे  व चंचल दत्तात्रय खरात यांनीही १०० पैकी १०० गुण मिळविले.

जाहिरात

       संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे भाग्यवान पालक तसेच प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे  व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.

यशस्वी विद्यार्थी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे