एस जी विद्यालय कोपरगाव

श्रीमान गोकुळचंजी विद्यालया मध्ये १९७२च्या माजी विद्यार्थीचा मेळावा संपन्न

श्रीमान गोकुळचंजी विद्यालया मध्ये १९७२च्या माजी विद्यार्थीचा मेळावा संपन्न

कोपरगावात ५२ वर्षानंतर एकत्र आले मित्र-मैत्रिणी 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ मे २०२४कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयामध्ये १९७२मध्ये दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी दिनांक १९मे रोजी संपन्न झाला. तब्बल ५२ वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी तसेच विदयालयांचे सेवानिवृत्त शिक्षक एकमेकांना भेटुन शाळेच्या जुन्या आठवणीत रममाण झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षक वृंदाचा सन्मान केला.

जाहिरात

या मेळाव्याचे चे अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीप अजमेरे होते. पिपल्स बॕकेचे माजी अध्यक्ष रामविलास मुंदडा मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,उप मुख्याध्यापक रमेश गायकवाड,पर्यवेक्षिका उमा रायते आदी या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी नमस्कार करुन टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. माजी विदयार्थीच्या स्वागतामुळे शिक्षक वृंद अक्षरशः भारावून गेले. तत्कालीन दिवंगत शिक्षक आणि माजी विदयार्थीना श्रद्धांजली वाहीली. या वेळी माजी शिक्षक नंदकीशोर परदेशी म्हणाले कर्तृत्ववान पिढी घडवण्यासाठी शिक्षकां बरोबरच पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे.मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी प्रास्ताविक केले.

जाहिरात

साठी गाठलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आता सुदृढ आरोग्यासाठी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे सांगून सर्वानी कुटुंबांसह स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव कार्यक्रमाचे अध्यक्ष दीलीप अजमेरे यांनी केले.
या वेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या गमतीजमती सांगून सर्वांना भुतकाळात नेले. या वेळी आजोबाच्या भूमिकेत असलेले विद्यार्थी शाळेत लहान होऊन रमले होते. ५२ वर्षांपूर्वी ज्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले त्या शाळेत आज आपली मुले मुली,नातु शिक्षण घेत आहेत या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणीत रममाण होता आले. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आगळावेगळा आनंद ओसंडून वाहत होता.

जाहिरात

प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणात सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन करुन श्रीमान गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व लगेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे व सहसचिव सचिनअजमेरे,पिपल्स बँक चे माजी अध्यक्ष श्री रामविलास जी मुंदडा यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. त्यानंतर निवृत्त शिक्षक श्रीमती रजनी गुजराती, माजी मुख्याध्यापक ए.एच. कुलकर्णी,नंदकीशोर परदेशी व माजी उपमुख्याध्यापक रमेश लुंपटकी त्या प्रमाणे विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद पुरुषोत्तम को-हाळकर ,उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड पर्यवेक्षिका उमा रायते, शिक्षक सुरेश गोरे,अनिल अमृतकर आदीचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी माजी विद्यार्थी,निवृत्त शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर या मेळावा आयोजनात प्रमुख भुमिका निभावलेले आयोजक सुरेश बजाज, सुधीर निसाळ,सुरेश कुर्लेकर ,श्रीमती शोभा पांडे व रविंद्र को-हाळकर यांचा विदयालयांच्या वतीने शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. विदयालयांचे शिक्षक सुरेश गोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

जाहिरात

या वेळी १९७२मध्ये इ.१० परीक्षेतील गुणवंत माजी विद्यार्थी डाॕ.उदय क्षत्रिय,तेजमल धाडीवाल,डॉ प्रदीप गिरमे, अशोक होडे आणि सुशिला अग्रवाल यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. या सर्वांचे श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य राजेश ठोळे,श्री.आनंद ठोळे,संदीप अजमेरे,अमोल अजमेरे यांनी अभिनंदन केले. सुधीर निसळ यांनी आभार मानले. शेवटी सर्वानी स्नेहभोजनचा आस्वाद घेतला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे