संवत्सर येथील दहावीच्या गुणवंत विद्यार्थीनीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
संवत्सर येथील दहावीच्या गुणवंत विद्यार्थीनीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

कोपरगाव विजय कापसे दि ४ जुन २०२४– कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कुलच्या नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षा निकालात प्रथम क्रमांक मिळविणारी भक्ती शिवाजी शेटे ९५ % मार्क द्वितीय क्रमांक मिळविणारी अपूर्वा दत्तात्रय गायकवाड ९२ % मार्क तर तृतीय क्रमांक मिळविणारी समीक्षा सचीन भाकरे ८५ % मार्क या गुणवंत मुलींचा सत्कार सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी संजीवनी पतसंस्थेचे व्हा चेअरमन राजेंद्र परजणे,भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष तथा संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे, ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, छाया काळे, अनिल शेटे, सचीन भाकरे, शिवाजी शेटे, अर्चना शेटे,संवत्सर पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर दत्तात्रय गायकवाड, दिपाली गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी गुणवंत मुलींना शुभेच्छा देतांना सांगितले की मुलींनो खूप शिक्षण घ्या तुमच्यातील कोणी डॉक्टर,वकील, इंजिनीयर व्हा आणि आपल्या गावचे नाव मोठे करा आणि आपण आपल्या गावकरिता भविष्यात काही तरी करावं अशी अपेक्षा नेहमी आपल्या मनात ठेवा असे बोलून सर्व मुलींना शुभेच्छा दिल्या व सर्व मुलींना अशोक वृक्षाचे रोप सत्कार प्रसंगी देण्यात आले तर महेश परजणे, दत्तात्रय गायकवाड, राजेंद्र परजणे यांनी शुभेच्छा दिल्या तर मुकुंद मामा काळे यांनी गुणवंत विद्यार्थीनीना पेन डायरी आणि जनरल नॉलेजचे पुस्तक देऊन सत्कार केला.

या सर्व यशस्वी विद्यार्थीनीना शाळेचे मुख्याध्यापक रमेश मोरे ,वर्गशिक्षक सुनील वाघमारे ,पर्यवेक्षक शरद आंबिल्वदे , भगवान शिंदे, रमेश दाणे, निवृत्ती तायडे, अनिल बनसोडे, प्रदीप भोये, गणेश आंबरे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांनी देखील अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.





