भाऊसाहेब वाकचौरे ४ लाख ७६ हजार ९०० इतकी मते मिळवत विजयी तर वाचा कोणत्या तालुक्यात मिळाले किती मत
भाऊसाहेब वाकचौरे ४ लाख ७६ हजार ९०० इतकी मते मिळवत विजयी तर वाचा कोणत्या तालुक्यात मिळाले किती मत
नावात साम्य असलेले अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मुळे विजयी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचे घटले मताधिक्य

कोपरगाव विजय कापसे दि ४ जून २०२४– देशाच्या लोकशाहीच्या लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा निकाल आज मंगळवार दिनांक ४ जून रोजी जाहीर होत असून यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे ४ लाख ७६ हजार ९०० इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे त्यांनी विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा दारुण पराभव केला.

ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे ५०५२९ मतांनी विजयी
शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण १० लाख ६० हजार ४१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता यात ५५४ मते बाद झाली तर ५३८० मतदारांनी NOTA चा वापर केला.शिर्डी लोकसभा मतदार संघात खालील उमेदवारांना तालुकानिहाय मिळालेली मते.

भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (विजयी महाविकास आघाडी ठाकरे गट)अकोला-९३०२५.संगमनेर-९७५६१.शिर्डी-६८६२०.कोपरगाव-६८०२३.श्रीरामपूर-७४९६०.नेवासा-७३४४५.पोस्टल-१२६३.एकूण-४७६९००.

सदाशिव लोंखडे (पराभूत महायुती शिंदे गट)अकोला-३८६४६संगमनेर-६६९८८शिर्डी-८१९९४कोपरगाव-७४७५२श्रीरामपूर-८६५४५नेवासा-७६५७३पोस्टल-८७३एकूण-४२६३७१

उत्कर्षा रूपवते (पराभूत वंचित)अकोला-८८४०संगमनेर-१०९२३शिर्डी-१८८९१कोपरगाव-१७७६०श्रीरामपूर-२२०२८नेवासा-१२३०६पोस्टल-१८१एकूण-९०९२९

नोटाअकोला-१०६७संगमनेर-७८९शिर्डी-१०२०कोपरगाव-९९२श्रीरामपूर-७३५नेवासा-७२३पोस्टल-५४एकूण-५३८०

विजयी उमेदवार यांच्या नावात साम्य असलेले अपक्ष उमेदवार भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (पराभूत अपक्ष)
अकोला-४२३३
संगमनेर-२११४
शिर्डी-१६१३
कोपरगाव-१८१९
श्रीरामपूर-१७९९
नेवासा-२२९५
पोस्टल-३३
एकूण-१४००६



