आ.आशुतोष काळेंच्या सहकार्यातून दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप शिबीर
आ.आशुतोष काळेंच्या सहकार्यातून दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप शिबीर
आ.आशुतोष काळेंच्या सहकार्यातून दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप शिबीर
कोपरगाव विजय कापसे दि ११ जुन २०२४ :- कोपरगाव मतदार संघातील गरजू दिव्यांग व्यक्तींना आवश्यकतेनुसार लागणाऱ्या कृत्रिम अवयवांचे आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवार (१४) रोजी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरीटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथे सकाळी १०.०० वा. फेलोशिप ऑफ फिजिकली हँडीकॅप्ड, मुंबई व आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कृत्रिम अवयवांचे मोजमाप शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
दुर्दैवाने किंवा अपघाताने शरीराचा अवयव गमवाव्या लागणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे राहाता यावे यासाठी आ. आशुतोष काळे यांनी दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यापासून ते त्यांना मोफत कृत्रिम अवयव देवून त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आजपर्यंत अनेक गरजू दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे.
तरीदेखील शरीराचा अवयव नसणारे जे दिव्यांग बांधव अजूनही मोफत कृत्रिम अवयव मिळण्यापासून वंचित आहेत त्या दिव्यांग बांधवांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांग बांधवांना आवश्यक असणाऱ्या कृत्रिम अवयवांचे मोजमाप घेण्यात येणार आहे. तसेच ज्या दिव्यांग बांधवांना व्हील चेअर, कुबडी, वॉकर, तीन चाकी सायकल, कमोड चेअर, वॉकींग स्टीक अशा साहित्याची आवश्यकता असेल त्यांना त्या-त्या साहित्याचे वाटप देखील करण्यात येणार आहे. ज्या गरजू दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव किंवा साहित्याची आवश्यकता आहे अशा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी किंवा त्यांच्या पालकांनी आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.