आपला जिल्हा
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघा करिता जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी मतदान करावे- अपर आयुक्त निलेश सागर
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघा करिता जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी मतदान करावे- अपर आयुक्त निलेश सागर
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी होत आहे निवडणूक

नाशिक प्रतिनिधी- दि २४ जून २०२४ (विमाका वृत्तसेवा) नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४ करिता सर्व मतदारांनी बुधवार दि २६ जून २०१४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत आपल्याशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान नोंदवावे, असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर यांनी केले आहे.

या निवडणूकीत सर्व मतदान केंद्रांतील मतपत्रिकांची सरमिसळ करुन मतमोजणी केली जाते, त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रात कोणत्या उमेदवारास किती मते मिळाली, असा तपशिल तयार केला जात नाही. मतदारांनी मोठया संख्येने निर्भयपणे मतदान करावे, असेही श्री.सागर यांनी कळविले आहे.




