करंजी बु

करंजी गावातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घ्यावा- सरपंच आगवन

करंजी गावातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घ्यावा- सरपंच आगवन
करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रविंद्र आगवन यांचे आवाहन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ जुलै २०२४–  :- महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प मांडताना  केली असुन तरी कोपरगाव तालुक्यातील व करंजी गावातील या जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन  कोपरगाव तालुक्यातील करंजी गावचे सरपंच रविंद्र आगवन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जाहिरात

या पत्रकात करंजी गावचे सरपंच रविंद्र आगवन यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य सरकारने “मुख्यमंत्री लाडकी बहिण” हि अत्यंत महत्वाची योजना राज्यातील या  २१ ते ६५ वय वर्ष असलेल्या महिलांसाठी सुरू केली असून या योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना शासनाच्या नियम व अटी नुसार जुलै २०२४ पासून महिन्याला एक हजार पाचशे रुपये म्हणजेच १५०० रुपये मिळणार आहे. त्यामुळे शासकीय निकषानुसार पात्र महिलांनी स्वतःचे आधारकार्ड, रेशनकार्ड/जन्म दाखला/मतदान कार्ड/ शाळा सोडल्याचा दाखला या पैकी एक आवश्यक, उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदार हमीपत्र, बँक पासबुक,स्वतःचा फोटो आदी…

जाहिरात
 आवश्यक त्या कागदपत्रासह सेतू केंद्र, ऑनलाइन संगणक प्रणाली, मोबाईल अॅप या माध्यमाचा वापर करत लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. विशेष म्हणजे या योजनेकरिता ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली असून पात्र महिलांनी ३१ ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज केला तरी तिला जुलै या महिन्या पासूनच शासकीय नियम व अटी नुसारच १५०० रुपयेचा आर्थिक लाभ सुरू होणार आहे त्यामुळे महिलांनी घाई करू नये तसेच ५ एकर शेतीची अट देखील शासनाने रद्द केल्याने सरसकट सर्व पात्र शेतकरी महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच आपल्या घरातील पात्र २१ वर्षीय एक अविवाहित मुलीला देखील या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे आगवन यांनी सांगत अधिक माहिती साठी ग्रामपंचायत कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच आगवन यांनी केले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये खाते उघडणे सुरू
कोपरगाव शहरातील खंदकनाला येईल महाराष्ट्र ग्रामीण बँक या शाखेत सर्व महिलांचे बँक खाते उघडणे सुरू झाले असुन महिलांना स्वतःचा फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स व खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम घेऊन त्वरित बँकेत संपर्क साधत अगदी काही वेळेत आपले बँक खाते उघडून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सज्ज व्हा.
सदाशिव तुपे
बँक व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक कोपरगाव
रविंद्र आगवन

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे