आपला जिल्हा

म्हाळुंगी पुलाच्या बदनामीवरून  आ.तांबे यांची सेनेच्या शहर प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज

म्हाळुंगी पुलाच्या बदनामीवरून  आ.तांबे यांची सेनेच्या शहर प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज

– निवडणूक काळात खोटी माहिती पसरवण्याचा आरोप
– कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी

संगमनेर प्रतिनिधी दि १ डिसेंबर २०२५ : म्हाळुंगी पुलाचे काम आ.सत्यजीत तांबे यांच्यामुळे रखडले असे खोटे व बदनामीकारक विधान शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्धी माध्यमांमधून केले होते .याबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी च अब्रू नुकसानीचा दावा केला होता. मात्र पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप पर्यंत कुठलेही उत्तर न आल्याने या पुलाबाबत जाणूनबुजून खोटी व दिशाभूल करणारी बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विनोद मनोहर सूर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात

आमदार सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 15 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक वृत्तपत्रांतून “काँग्रेस समर्थित पदवीधर आमदाराने म्हाळुंगी पुलाचे काम रखडवले” असा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन आरोप सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केला. हा आरोप अत्यंत खोटा आणि बदनामीकारक असल्याने आमदार सत्यजीत तांबे यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी विनोद मनोहर सूर्यवंशी यांच्या विरोधात अब्रू निशाणीचा दावा दाखल केला होता. मात्र आता पंधरा दिवस होऊ नये कोणतेही उत्तर न आल्याने आता शहर प्रमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जाहिरात

याबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले की म्हाळुंगी पुलासाठी लागणारा संपूर्ण निधी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केला होता, आणि आरोपी किंवा त्याच्या पक्षाचा या निधीशी कसलाही संबंध नाही.

ते पुढे म्हणतात, “मी अपक्ष आमदार असून भारतीय जनता पक्ष, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्यत्व घेतलेले नाही. तरीदेखील आरोपी आणि त्याच्या पक्षातील काही नेते जनतेची दिशाभूल करण्यासाठी परस्परविरोधी व भ्रामक विधाने करीत आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला व विश्वासार्हतेला गंभीर धक्का बसला आहे. अनेक नागरिकांकडून मला या संदर्भात विचारणा होत आहे. आरोपीने जाणीवपूर्वक खोटी माहिती प्रसारित करून माझी सार्वजनिक प्रतिमा धोक्यात आणली आहे.”

जाहिरात

तांबे यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. तथापि, सदर आरोपीने कोणतीही माफी मागितली नाही किंवा खोटा आरोप मागे घेतला नाही. त्यामुळे हे कृत्य सरळ सरळ कायद्याचे जाणूनबुजून केलेले उल्लंघन असल्याचे तांबे यांनी नमूद केले आहे.

त्यामुळे, भारतीय न्याय संहिता 2023 : कलम 252, 253 (बदनामी), कलम 206 (निवडणूक काळात खोटी माहिती पसरवणे), महाराष्ट्र नागरी सेवा (आचार) कलम 123 (राजकीय हेतूने खोटी माहिती पसरवणे), माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 : कलम 66(D) (सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे)  तरी सदर कलमान्वये विनोद मनोहर सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि प्रकरणाची सखोल चौकशी करून FIR नोंदवावी, अशी मागणी आमदार तांबे यांनी केली आहे. या प्रकरणाची कायदेशीर बाजू ॲड. अमोल कारभारी घुले पाहत आहेत.

 शिंदे गटातील बेताल वर्तनाबाबत नागरिकांची नाराजी

शिंदे गटाचे शहरप्रमुख सूर्यवंशी यांच्या बेताल विधानांमुळे, दिशाभूल करणाऱ्या भूमिका आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वारंवार होणाऱ्या वाद–हाणामाऱ्या यामुळे शहरातील वातावरण अस्थिर होत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये दिसून येत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या तक्रारी, अंतर्गत कलह आणि सलग घडणाऱ्या विवादांमुळे अस्वस्थतेचे वातावरण निर्माण करण्यास हेच लोक कारणीभूत ठरत असल्याचे मत सामान्यांनी व्यक्त केले आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे