आपला जिल्हा
खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
ज्योती पतसंस्थेस दिला होता चेक

कोपरगाव विजय कापसे दि ९ जुलै २०२४— कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्जदार सौ. शैला अनिल खैरे यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी पतसंस्थेला दिलेला २० लाख रुपयाचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस.सी.सी.नं.३०९/ २०१९ दाखल केला होता. त्यामध्ये चौकशीअंती आरोपी शैला अनिल खैरे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोपरगांव येथील न्यायाधिश भगवान धों. पंडित यांनी आरोपीस ६ महिन्याची साधी कैदेची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती सहकारी पतसंस्थेस २५ लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला तसेच नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्यात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा ६ महिन्याची सख्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. याकामी अॅडव्होकेट एस्. डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.




