साई शक्तीचा माजी विद्यार्थी चंद्रपूर सैनिकी शाळेत १० वीच्या परीक्षेत ९१.८ टक्के मार्क मिळवत यशस्वी
साई शक्तीचा माजी विद्यार्थी चंद्रपूर सैनिकी शाळेत १० वीच्या परीक्षेत ९१.८ टक्के मार्क मिळवत यशस्वी
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २९ मे २०२५-कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील कासली येथील शासन मान्य साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचे माजी विद्यार्थी यशाची अनेक पावले टाकत समाजात चमकत असून नुकताच दहावीच्या सीबीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी उत्कर्ष प्रदीप व्यवहारे यांनी चंद्रपूर येथील सैनिकी शाळेत ९१.८ टक्के मार्क मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे शासनमान्य कोपरगाव तालुक्यातील कासली येथे सामान्य कुटुंबातील मुलां-मुलींना इंग्रजी मधून शिक्षण घेता यावे या उद्देशाने साई शेती इंग्लिश मीडियम स्कूल सुरू असून या शाळेमधून शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी यशस्वी होत आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोपरगाव शहरातील उत्कर्ष प्रदीप व्यवहारे यांने आपले प्राथमिक शिक्षण साई शक्ती मध्ये पूर्ण करत सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत चंद्रपूर येथील सैनिकी शाळेत प्रवेश मिळवत नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९१.८% टक्के मार्क मिळवत घवघवीत यश संपादन करत नावलौकीक मिळविला आहे.जाहिरात
त्यांने मिळवलेल्या या विषयाबद्दल ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.परशराम साबळे यांनी उत्कर्ष प्रदीप व्यवहारे याचे व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत तर त्याच्या या यशाबद्दल साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विजय जाधव, कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे लिपिक निलेश देवकर आदींनी कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.जाहिरात