आत्मा मालिक गुरुकुल च्या वारकऱ्यांनी अवघी दुमदुमली येवला नगरी
आत्मा मालिक गुरुकुल च्या वारकऱ्यांनी अवघी दुमदुमली येवला नगरी
आत्मा मालिक गुरुकुल च्या वारकऱ्यांनी अवघी दुमदुमली येवला नगरी
येवला विजय कापसे दि १८ जुलै २०२४– विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथून येवला नगरीतील मुख्य विठ्ठल मंदिरापर्यंत आत्मस्वरूप विठ्ठल माऊली दिंडी काढण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे हेमंत शाह व गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले.तसेच पालखी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सोनाली परदेशी यांनी एकादशीची माहिती सांगितली.तसेच प्राचार्य तुषार कापसे व हेमंत शाह यांनी देखील विद्यार्थ्यांना एकादशीच्या शुभेच्छा देऊन एकादशी विषयी थोडक्यात माहिती सांगितली.
तपस्या कुऱ्हे,रोहिणी जाधव,श्रुती बोडके,पायल डुकरे,तनिष्का ढोपरे, दिव्या जगताप,सृष्टी रायजादे, प्रज्ञा लोणारी या विद्यार्थिनींनी विठुरायाची नगरी हे भजन सादर केले. तसेच श्रावणी वरोडे,मनुष्री वडनेरे,भक्ती जगताप,वेदिका आहेर, वेदिका लचके,शार्वि लग्गड या दहावीच्या विद्यार्थिनींनी रखुमाई रखुमाई हे भजन सादर केले. कोमल शिंदे,आर्या जगदाळे,ईश्वरी आसणे,अक्षरा कोकणे,आरोही कायस्थ, दृष्टी पाटोळे या पाचवीच्या विद्यार्थिनींनी विठ्ठलाच्या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य केले. त्यानंतर आत्मा मालिक माऊली तपोभूमी येवला येथून विठ्ठलाचा जयघोष करत दिंडी काढण्यात आली.दिंडीमध्ये एकूण ३७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.त्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची एक जोडी होती.पालखी वाहक विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठलाची पालखी विठ्ठल मंदिरापर्यंत अतिशय आनंदाने घेतली. तसेच गुरुकुलातील लहान पासून तर मोठ्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी दिंडीमध्ये पावली देखील सादर केली.आणि रिंगणामध्ये विद्यार्थ्यांची व शिक्षिका यांची फुगडी घेण्यात आली.
दिंडीत सहभागी असलेल्या सर्व मुलांनी टोपी,सफेद कुर्ता आणि पायजमा असा वारकरी पोशाख घातलेला होता.व सर्व मुलींनी महाराष्ट्राची संस्कृती जपत नऊवारी साडी घातलेली होती. संपूर्ण दिंडीमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी नामाचा जयघोष चालला होता. जणू काही पंढरपूरलाच दिंडी निघालेली आहे असा अनुभव सर्व येवले करांना आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता हेडगिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य,सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी,सर्व पालकवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.