एस जे एस रुग्णालयात शुक्रवारी सर्व रोग निदान शिबीर; ५० टक्के सवलतीच्या दरात होणार तपासण्या
एस जे एस रुग्णालयात शुक्रवारी सर्व रोग निदान शिबीर; ५० टक्के सवलतीच्या दरात होणार तपासण्या
एस जे एस रुग्णालयात शुक्रवारी सर्व रोग निदान शिबीर; ५० टक्के सवलतीच्या दरात होणार तपासण्या
कोपरगाव विजय कापसे दि १८ जुलै २०२४ :- कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात शुक्रवार १९ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत श्री जनार्दन स्वामी रुग्णालय आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन,सल्ला व आवशकता असल्यास मोफत शास्र्क्रिया करण्यात येणार आहे.यात एम डी मेडिसिन डॉ.सायली ठोमरे,मेंदू व मनका तज्ञ डॉ.प्रसाद उंबरकर, आस्ठीरोग तज्ञ डॉ.संदीप राजेबहादूर, हृदयरोग तज्ञ डॉ.अनिल गवळी, कॅन्सर तज्ञ डॉ.राकेश जाधव, बालरोगतज्ञ डॉ.अनंतकुमार भांगे, रेडीओलॉजिस्ट डॉ. तृप्ती भिसे, नेत्ररोग तज्ञ डॉ.गणेश गायकवाड,स्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहल भाकरे, दंतरोग तज्ञ डॉ.सोनाली काळे, डॉ.प्राप्ती नरोडे हे अनुभवी डॉक्टर उपस्थित असणार आहे.
एक्स-रे, इसीजी, बी.पी, शुगर, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, बायपास मोफत होणार असून औषधे मोफत मिळणार आहे. ५० टक्के सवलतीच्या दरात एम.आर.आय, सिटी स्कॅन,२ डी इको, सोनोग्राफी,रक्ताच्या सर्व तपासण्या होणार आहे. रुग्णालयात महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत योजनेत केशरी,पिवळे रेशन कार्ड धारकांचे मोफत उपचार होत आहे.या शिबिराचे जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या प्रशासने केले आहे.