बस स्टँड मधील सुलभ शौचालय मुली महिलासाठी मोफत करावे व दोन्ही मुख्य प्रवेशद्वार रस्ते दुरुस्त करावे- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
बस स्टँड मधील सुलभ शौचालय मुली महिलासाठी मोफत करावे व दोन्ही मुख्य प्रवेशद्वार रस्ते दुरुस्त करावे- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्या कडे केली मागणी
कोपरगाव विजय कापसे दि २२ जुलै २०२४– कोपरगाव बस स्टँड मध्ये असलेले महिलांसाठीचे सुलभ शौचालय स्वच्छ ठेवून ते निशुल्क करावं व आत येणारे जाणारे मुख्य प्रवेशद्वाराचे खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्या कडे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आज त्या कोपरगाव बस स्टँड येथे त्या तक्रार निवारण साठी आल्या असता त्यांना समक्ष भेटून केली यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे , यांत्रिकी प्रमुख पंडित , आगार प्रमुख अमोल बनकर , स्थानिक प्रमुख योगेश दिघे , सहाय्यक वाहतूक निरीक्षक नाना आहेर यांचेसह नागरिक उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरात ग्रामीण भागातून शालेय शिक्षणासाठी, कॉलेज साठी मुली , शेतकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने गावाच्या ठिकाणी रोज ये जा करत असतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी कोपरगाव शहरात येणे जाण्यासाठी बस हे एकमेव परवडणार साधन आहे.परंतु दुर्दैवाची गोष्ट की बस स्टँड मध्ये आत येताना व बाहेर जाताना जे दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसामुळे पाणी साचले आहे व ते मुला मुलींच्या नागरिकांच्या एसटी बस व वाहन गेले की अंगावर उडत असते व आत जायला , बाहेर पडायला सर्वांना त्रास होतो. मोठे खड्डे असल्याने नागरिक यात पडतात सुद्धा. हे खड्डे तातडीने बुजवावे व बस स्टॅन्ड मधील सुलभ शौचालयात पैसे आकारले जातात ते या मुलींना नागरिकांना महिलांना परवडणारे नाही. बस स्थानकाची सुलभ शौचालय उभारून ते स्वच्छ ठेवणे व निशुल्क देणे ही जबाबदारी बस डिपार्टमेंट ची आहे.त्यामुळे बस स्थानक प्रशासनाने तत्काळ शौचालयासाठी आकारण्यात येणारे पैसे घेणे बंद करावे व प्रवेशद्वार मधील दोन्ही रस्ते दुरुस्त करावे अन्यथा शाळकरी व महाविद्यालयात बसने प्रवास करणाऱ्या मुलींना व ग्रामीण भागातील महिला भगिनींना सोबत घेऊन बस स्टॅंडवर सर्व बस गाड्या थांबून आंदोलन करावे लागेल असा इशारा पाटील यांनी या प्रसंगी दिला.
मुख्य प्रवेशद्वारा मधील आत व बाहेर जाणाऱ्या रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांबाबत बोलताना अधिकारी म्हणाले किती ही हद्द नगरपालिकेची आहे. आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला कळवले पण अध्याप नगरपालिका ते करून देत नाहीत . यामुळे नगरपालिका आणि बस स्टँडच्या जागेच्या हक्काच्या वादात नागरिकांची हाल होत आहे. तरी नगरपालिकेने तातडीने खडी करण करून त्यावर तात्काळ डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून द्यावे.
मंगेश पाटील माजी नगराध्यक्ष