कोकणगावचे उपसरपंच अरुण जोंधळे यांना मातृशोक
कोकणगावचे उपसरपंच अरुण जोंधळे यांना मातृशोक
कोकणगावचे उपसरपंच अरुण जोंधळे यांना मातृशोक
संगमनेर प्रतिनिधी दि २५ जुलै २०२४—काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे वाहन चालक तथा कोकणगावचे उपसरपंच अरुण जानकु जोंधळे यांच्या मातोश्री कमलाबाई जोंधळे यांचे निधन झाले असून अरुण जोंधळे यांना मातृषोक झाला आहे.
कमलाबाई जानकू जोंधळे या अत्यंत धार्मिक व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत त्यांनी सातत्याने ही पताका पुढे चालवली. हाच वारसा ह.भ. प. अरुण जोंधळे यांनी जपला असून तेही सातत्याने वारकरी संप्रदायात कार्यरत आहे. याचबरोबर समाजकार्यात काम करताना गावचे उपसरपंच पद सांभाळताना कोकणगाव व शिरापूर साठी मोठा निधी मिळून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. याचबरोबर अनेक दिवस पंढरीची वारी करताना आणि नामदार बाळासाहेब थोरात यांचे वाहन चालक म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत
कमलाबाई जानकू जोंधळे यांच्या निधनाने कोकणगाव परिसरात मोठी हळद व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली पुतणे नातू सुना असा मोठा परिवार आहे.
कमलाबाई जोंधळे यांच्या निधनाबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, रणजीत सिंह देशमुख, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह विविध मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.