सह्याद्री ज्युनिअर कॉलेज मध्ये संविधान संवाद
सह्याद्री ज्युनिअर कॉलेज मध्ये संविधान संवाद
सह्याद्री ज्युनिअर कॉलेज मध्ये संविधान संवाद
संगमनेर प्रतिनिधी दि २५ जुलै २०२४– भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेज मध्ये भारताचे संविधान या विषयावरती छात्रभारतीचे कार्यवाह अनिकेत घुले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान जगाच्या पातळीवरती प्रगल्भ अाहे. संविधानामुळे आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य मिळाल, अापल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला. अशा अनेक विषयांवरती त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य के.जी. खेमनर सर यांनी केले. उपप्राचार्य प्रा. संजय सुरसे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी कॉलेजचे शिक्षक प्रतिनिधी प्रा. गणेश गुंजाळ, प्रकल्प प्रमुख प्रा. एन.एस. गुंड, वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्रा. ए. के. दातीर, प्रा. माधूरी भुसाळ, रत्नमाला पाटील मॅडम, छात्रभारतीचे मोहम्मद कैफ तांबोळी तसेच सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जी. सी. भवर यांनी केले तर आभार प्रा. ए. के. दातीर यांनी व्यक्त केले.