संगमनेर

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा संपन्न.

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा संपन्न.

विद्यार्थ्यांनी आदर्श संस्कारातून उज्ज्वल यश संपादन करावे प्राचार्य के जी खेमनर सर

संगमनेर प्रतिनिधी दि २५ जुलै २०२४भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी पालक शिक्षक संघ कार्यकारिणीची सभा नुकतीच विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  के.जी. खेमनर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी पालक प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली.
प्रारंभी उपस्थित पालक प्रतिनिधी व नवनियुक्त पदाधिकारी यांचा ओवी पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

जाहिरात

यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य श्री के.जी.खेमनर सर म्हणाले , सह्याद्री शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेत अधिक उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कारीत करून अभ्यासासाठी पालकांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. तसेच विद्यालयातील दहावी शालांत परीक्षेच्या निकालाचा आढावा घेऊन आगामी काळात विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण क्षेत्राकडे वाटचाल करण्यासाठी परिश्रम व जिद्दीने वाटचाल करावी, असे अवाहन त्यांनी केले.

जाहिरात

याप्रसंगी पालक प्रतिनिधी प्रा.अमोल दातीर यांनी विद्यालयातील विद्यार्थी गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकास, विविध शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेची तयारी या गुणात्मक विकासासाठी पालक विद्यार्थी प्रवेशासाठी सह्याद्री विद्यालयास अधिक पसंती देत असल्याचे गौरव उद्गार काढले. रूपालीताई पर्बत यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगती आणि विद्यार्थी गुणवत्तेसंबंधी शिक्षक वृंद व प्रशासनाचे कौतुक केले, तर क्रीडाशिक्षक  मिलिंद औटी सर यांनी, पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिस्त आणि आदर्श विकासासाठी शाळेतील शिक्षकांच्या सकारात्मक भूमिकेच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आवाहन केले.

जाहिरात

या पालक शिक्षक संघाच्या सभेसाठी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा रूपालीताई पर्बत , पर्यवेक्षक  डोखे सर , पालक शिक्षक संघाचे सचिव  किशोर शिंदे सर, पालक प्रतिनिधी प्रा. अमोल दातीर सर,  सचिन खरात सर,खान जाकीर नबाब,  सतीश दिघे योगिता पावबाके , सविता वराडे , ललिता गाडेकर तसेच शिक्षक प्रतिनिधी  उमेश नेहे सर ,  मिलिंद औटी, तुषार गायकर सर, कलाशिक्षक  मिनीनाथ जोर्वेकर,  सूर्यभान पथवे सर,  पवार सर,  संतोष देशमुख सर,श्रीमती उज्वला घुले मॅडम, श्रीमती ताई वर्पे मॅडम , विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य झंझाड,कु.अमृता पवार आदीसह , शिक्षक ,शिक्षकेत्तर सेवक वृंद आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किशोर शिंदे सर यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री डोखे सर यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे