कोपरगांव तालुका क्रीडा समिती जाहीर; अध्यक्षपदी नितीन निकम यांची निवड
कोपरगांव तालुका क्रीडा समिती जाहीर; अध्यक्षपदी नितीन निकम यांची निवड
कोपरगाव विजय कापसे दि २८ जुलै २०२४– अहमदनगरचे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारि व तालुका क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांच्या प्रमुख उपस्थित गुरुवार दि २५ जुलै रोजी कोपरगांव येथील तालुका क्रीडा संकुलात कोपरगाव तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा झाली असता चालू शैक्षणिक वर्षासाठी शालेय शासकीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोपरगाव तालुका क्रीडा समिती कार्यकारणी जाहीर केली असून यात कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी नितीन निकम यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच तालुका उपाध्यक्षपदी निलेश बडजाते,सुधाकर निलक, अजित पवार, संजय अमोलिक, सचिव व तालुका प्रसिध्दी प्रमुखपदी अनुप गिरमे, सहसचिव पदी देवेंद्र भोये, रविंद्र नेदरे, मिलिंद कांबळे,भीमाशंकर औताडे , आकाश लकारे (पंच – संघटना प्रतिनिधी, सदस्य पदी अशोक गायकवाड, राजेन्द्र देशमुख, शिवराज पाळणे, रामदास गव्हाणे , विरूपक्ष रेड्डी, किरण बोळींज, महिला प्रतिनिधी म्हणून अस्मिता रायते, जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रतिनिधी शिवप्रसाद घोडके यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.