आमदार आशुतोष काळे

दोन भावंडाचे प्राण वाचविणाऱ्या ताराबाई पवारांच्या मातृशक्तीचे आ. आशुतोष काळेंकडून कौतूक

दोन भावंडाचे प्राण वाचविणाऱ्या ताराबाई पवारांच्या मातृशक्तीचे आ. आशुतोष काळेंकडून कौतूक

दोन भावंडाचे प्राण वाचविणाऱ्या ताराबाई पवारांच्या मातृशक्तीचे आ. आशुतोष काळेंकडून कौतूक

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २८ जुलै २०२४ :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील येथील तांगतोडे कुटुंबातील तिघे भाऊ गोदावरी नदीच्या पाण्यात वाहून जात असतांना अंगावरची साडी काढून त्यातील दोघांना जीवदान देणाऱ्या ताराबाई पवार यांची आ.आशुतोष काळे यांनी भेट घेवून त्यांच्या मातृत्वाचे कौतुक केले आहे व तांगतोडे कुटंबाची भेट घेवून त्यांचे देखील सांत्वन केले आहे.

जाहिरात

गोदावरी नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मंजूर येथे गोदावरी नदीकाठी असलेला आपला वीजपंप बाहेर काढण्यासाठी गुरुवार (दि.२५) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तांगतोडे कुटुंबातील संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे व अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे भावंडे गेले असता पाण्याच्या वाढत्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे हे तिघेही भावंडे पाण्यात वाहून चालले असतांना मदतीसाठी याचना करीत होते.हे दृश्य गोदावरी नदीकाठी शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या छबुराव पवार व त्यांच्या पत्नी ताराबाई पवार यांनी पाहिले असता क्षणाचाही विलंब न करता हे पवार दाम्पत्य त्या तिघा भावंडाच्या मदतीला धावून गेले. त्यावेळी त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी कोणतेही साधन नसतांना ताराबाई पवार यांनी प्रसंगावधान राखून आपल्या अंगावरची साडी काढून या वाहत जाणाऱ्या तिघा भावंडाकडे फेकली. त्यावेळी यातील प्रदीप भीमाशंकर तांगतोडे व अमोल भीमाशंकर तांगतोडे यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले परंतु संतोष भीमाशंकर तांगतोडे हा मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहत जावून दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला.

जाहिरात

आ. आशुतोष काळे यांनी तांगतोडे कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. घडलेल्या दु:खद घटनेबाबत शोक व्यक्त करून पायमोडे कुटुंबाला धीर दिला. तसेच वाहून जाणाऱ्या तांगतोडे कुटुंबाच्या भावंडांचे जीव वाचविणाऱ्या ताराबाई पवार व छबुराव पवार यांची भेट घेवून त्यांच्या धाडसाचे व ताराबाई पवार यांच्या मातृशक्तीचे व त्यांनी योग्य वेळी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.

तांगतोडे भावंडाचे जीव वाचविणाऱ्या ताराबाई पवार व छबुराव पवार यांची आ. आशुतोष काळे यांनी घेतली भेट.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे