संगमनेर

सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  खेमनर यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव

 सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  खेमनर यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव

संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  के जी खेमनर यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव.

जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि २८ जुलै २०२४अहमदनगर येथे नुकताच संपन्न झालेल्या कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नामवंत शैक्षणिक संस्था आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यात संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  के जी खेमनर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जाहिरात

संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  के जी खेमनर सर यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेत विविध शाखांमधून अध्यापक, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक पदापर्यंत आपल्या शैक्षणिक कार्यातून आणि सामाजिक दायित्वातून वेगळा कार्याचा ठसा उमटविला आहे. सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी गुणवत्ता, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षेची तयारी ,नाविन्यपूर्ण सहशालेय उपक्रम, विद्यार्थी आणि पालकातील समन्वयाची भूमिका, देशभक्तीपर व पर्यावरण पूरक सहशालेय उपक्रमांचे आयोजन, तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चातून विद्यार्थ्यांप्रती मदतीची भावना त्यांच्या कार्याचा अनोखा पैलू आढळून येतो. त्यांच्या संस्थेतील कार्याचा शैक्षणिक प्रगतीचा उंचावलेला आलेख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेत अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले.

जाहिरात

 या पुरस्काराबद्दल संस्थेचे मार्गदर्शक राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन डॉ .सुधीर तांबे ,एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा  दुर्गाताई तांबे, संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे,सहसेक्रेटरी  दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार  बाबुराव गवांदे आदी सह संस्थेचे पदाधिकारी तसेच भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक, शिक्षिका ,प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर सेवक वृंद, विद्यार्थी व पालक आदींनी प्राचार्य खेमनर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे