कोपरगावचा विकास पाहता आ. आशुतोष काळे एक हजार टक्के पुन्हा आमदार होणार -प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे
कोपरगावचा विकास पाहता आ. आशुतोष काळे एक हजार टक्के पुन्हा आमदार होणार -प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे
पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार
कोपरगाव विजय कापसे दि २९ जुलै २०२४– :- महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेशी मन मोकळा संवाद साधण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार जन सन्मान यात्रा घेवून येणार आहेत. आजपर्यंत भरपूर यात्रा निघाल्या असल्या तरी, महाराष्ट्राच्या इतिहासात ही जन सन्मान यात्रा महाराष्ट्रातील जनता उचलून धरेल. या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील चैतन्य व कोपरगाव मतदार संघाचा झालेला विकास पाहता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या वेळी विधानसभा निवडणुका होतील त्यावेळी आ. आशुतोष काळे तुम्ही शंभर नाही हजार टक्के निवडून येवून पुन्हा आमदार होणार असून राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येवून ना.अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी कोपरगाव येथे व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या जन सन्मान रॅलीच्या नियोजनासंदर्भात कोपरगाव मतदार संघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच कोपरगाव येथे कृष्णाई बॅक्वेट हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत व आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम,अल्पसंख्यांक अध्यक्ष इंद्रिस नाईकवाडी, सामाजिक न्याय अध्यक्ष सुनिल मगरे,युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दक्षिण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा,सुभाष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले की,अनेक निवडणुका येतात आणि त्या वेगवेगळ्या राजकीय समीकरणे घेवून येतात. नगर जिल्हा राजकारणाच्या बाबतीत अतिशय जागरूक आणि संवेदनशील जिल्हा आहे. त्याप्रमाणे कोपरगाव मतदार संघ देखील अतिशय जागरूक असून २०१९ ला या मतदार संघातील सुजाण मतदारांनी २०१४ ची चूक दुरुस्त करून आशुतोष काळे यांच्यासारखा उच्च शिक्षित तरूण सहकारी विधिमंडळात पाठवून आपली राजकीय परिपक्वता सिद्ध केली आहे. आ. आशुतोष काळे यांनी परदेशात उच्च शिक्षण घेवून देखील आपल्या मातीची सेवा करण्याचा विचार मनात रुजवून घेत योग्य निर्णय घेतला.एका नेतृवाबद्दलचा विश्वास कसा असावा याचे उत्तम उदाहरण अजितदादांचा आ.आशुतोष काळे यांच्यावर असलेल्या विश्वासातून दिसून येते. आणि तो विश्वास ठरवतांना त्या विश्वासातूनच साडे चार वर्षात रस्ते, पूल, शेतकऱ्यांचे प्रश्न असे विविध विकासकामे पूर्ण करून कोपरगाव मतदार संघाचा करून दाखविलेल्या विकासाबद्दल आ.आशुतोष काळे यांचे कौतुक केले.
बहुजनांचा विकास हि संकल्पना घेवून अजितदादांनी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला भगिनींसाठी दरमहा १५०० रुपये,शेतकऱ्यांसाठी वीज पंपाच वीज बिल माफ व बारा तास मोफत वीज देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या यूक-युवतींना प्रती महिना दहा हजार रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला आहे अशा विविध योजना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आणल्या आहेत. तसेच अजितदादांनी केंद्र सरकारकडे स्वच्छपणे भूमिका मांडतांना शेतीला पूरक व्यवसायाला दूध व्यवसायास असून राज्य सरकार पाच रुपये त्या ठिकाणी अनुदान देणार आहे पण परदेशातून दुधाची भुकटी आयात करण्याच्या निर्णयावर पूर्णपणे बंदी आणली पाहिजे त्या मागणीची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेवून दखल दुधाची भुकटी आयात करणार नाही असा निर्णय घेतला.अशा विविध योजना कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पाहोचवून त्या योजनांचा लाभ मिळेपर्यंत स्वस्थ बसू नका असे आवाहन केले.
यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, पाच वर्षांमध्ये कोपरगाव मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या आशीर्वादातून भरघोस निधी आणून पूर्ण मतदार संघाचा कायापालट केला असून पुढचा आमदार तर मीच होणार आहे व राज्याचे मुख्यमंत्री देखील अजितदादा होणार आहे. त्यासाठी मी व माझे कार्यकर्ते कामाला लागलो आहोत. विकासाच्या बाबतीमध्ये कोणीही अजितदादांचा कोणी हात धरू शकत नाही हे खरे आहे. ना.अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असून आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्यामुळे सर्व कार्यर्त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो जोश व ताकद लावून आपण मला निवडून आणलं त्याच जोशात व त्याच ताकतीने निवडणुकीत उतरून मला निवडून देवून अजितदादांचे हात बळकट करा. विधानसभा निवडणुकीला कालावधी जरी कमी राहिलेला असला तरी या कालावधीमध्ये पाच वर्षात केलेले काम मतदारापर्यंत पोहोचवा. ना.अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्याचा लाभ त्यांना मिळवून या दोन महिन्यांमध्ये मिळवून द्या. विकासकामे भरपूर झालेले आहेत त्याचा फक्त प्रचार प्रसार कराअसे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले. यावेळी मंजूर येथील दोन भावांचा जीव वाचविणाऱ्या ताईबाई पवार यांचा रोख अकरा हजार रुपये देवून प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. अपक्ष माजी नगरेसवक मेहमूद सय्यद यांनी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन सर्व संचालक मंडळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी केले.सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी मानले.
आशुतोष कोपरगाव तालुक्यापुरते मर्यादित राहू नका—-
आपले आजोबा कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचे राज्यातील राज्यमंत्री म्हणून काम मी पहिले असून त्यावेळी मी राजकारणामध्ये अतिशय तरुण होतो. आपले वडील देखील माझ्यासोबत विधिमंडळामध्ये काम करीत होते. त्यामुळे तुम्ही कोपरगाव मतदार संघापुरते मर्यादित राहू नका.तुमची जबाबदारी तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे त्यामुळे तुम्ही जिल्ह्यात आजूबाजूला देखील फिरावे. तुम्ही केलेल्या विकासकामांमुळे व तुमच्या सारख्या उच्च शिक्षित, युवा आमदार ज्यावेळी महाराष्ट्रात फिरेल त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची व ना.अजितदादांची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही.
-प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे.
कार्यकर्त्यांची ती अपेक्षा मी पूर्ण करीन— खा.सुनील तटकरे यांच्या भाषणातून आ. आशुतोष काळे यांच्या कामाचे कौतुक होत असतांना प्रत्येक वेळी उपस्थित कार्यकर्ते टाळ्या वाजवून दाद देत होते. त्या टाळ्यांचा अर्थ प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी मोजक्याच शब्दात मांडला. ते म्हणाले, मी काही डॉक्टर नाही मात्र कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना मला स्पष्टपणे समजत आहे.कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेली अपेक्षा अर्थात आ.आशुतोष काळेंना मंत्रीपद ती कार्यकर्त्यांची अपेक्षा मी पूर्ण करीन असे अप्रत्यक्षपणे सुतोवाच त्यांनी केले.