लायन्स क्लब
लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव तर्फे मोफत फ्लेक्स वाटप
लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव तर्फे मोफत फ्लेक्स वाटप
कोपरगाव विजय कापसे दि २९ जुलै २०२४– नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असणाऱ्या लायन्स व लिओ क्लब कोपरगाव तर्फे अनोखा म्हणजेच गरजू लोकांना फ्लेक्स वाटप कार्यक्रम घेण्यात आला. पावसाळा सुरू झाला असून आजही कोपरगांव शहरात अनेक लोकांना पक्के छत असलेले घर नाही त्यामुळे घर पावसाळ्यात गळू नये म्हणून त्यावर ताडपत्री स्वरूपाचे अच्छादन राहावे म्हणून गरजू लोकांना फ्लेक्स वाटप करण्यात आले.