डॉक्टर डे निमित्त लायन्स क्लब कोपरगावच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांचा सन्मान
कोरोना काळातील डॉक्टरांचे योगदान विसरता कामा नये – ॲड. मनोज कडू
कोपरगाव विजय कापसे दि ४ जुलै २०२४– कोरोना काळात डॉक्टर , नर्सेस व त्यांचे सलग्न इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा भारतातील नागरिकांना दिली त्याच्यामुळे त्यांचे योगदान कधीही विसरता कामा नये असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष ॲड. मनोज बाळासाहेब कडू यांनी डॉक्टर्स डे चे निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.केले.
लायन्स क्लब ऑफ कोपरगाव नेहमीच सामाजिक कामात आग्रेसर असते त्याच अनुषंगाने डॉक्टर डे या दिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब कोपरगावच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे नुकताच संपन्न झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी जेष्ठ उद्योजक तुलसीदास खुबानी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ गुट्टे, डॉ अतिश काळे, डॉ तुषार गलांडे आदी मान्यवरांनी आपल्या भाषणात लायन्स क्लब ऑफ कोपरगाव च्या उपक्रमाचे कौतुक करत सर्व डॉक्टर बांधवांना शुभेच्छा दिल्या.