कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताह सुरु
कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताह सुरु
कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताह सुरु
कोपरगाव विजय कापसे दि ३० जुलै २०२४ – श्री. क्षेत्र खेडले झुंगे येथील ब्रम्हलीन परम पूज्य गुरुवर्य तुकारामबाबा यांच्या प्रेरणेतून कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कोसाका सांस्कृतिक, शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याहीवर्षी कारखाना कार्यस्थळावर श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज व श्री. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त मंगळवार दि.३०/७/२०२४ ते मंगळवार दि.०६/०८/२०२४ पर्यंत ४९ वा अखंड हरीनाम सप्ताह व भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला आहे.
मागील पाच दशकापासून कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी कारखाना कार्यस्थळावर सुरु केलेली अखंड हरीनाम सप्ताहाची धार्मिक परंपरा माजी आमदार अशोकराव काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी आजतागायत सुरु ठेवली आहे. याहीवर्षी या सप्ताह कार्यकाळात रात्री ९ ते ११ या वेळेत नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते ५ या वेळेत भगवान विष्णू मंदिरात विष्णू सहस्त्रनाम, ५ ते ७ काकडा, सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सप्ताहस्थळी सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ०९ ते ११ नियमित हरी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.यामध्ये मंगळवार (दि.३०) रोजी ह.भ.प.सागर महाराज घुमरे,
बुधवार (३१) रोजी ह.भ.प.सुभाष महाराज जगताप पढेगाव, गुरुवार (दि.०१) रोजी ह.भ.प. रेखाताई काकड निऱ्हाळेकर, शुक्रवार (दि.०२) रोजी ह.भ.प.टी.व्ही.स्टार माधव महाराज पैठणकर, शनिवार (दि.०३) रोजी रोजी ह.भ.प. टी.व्ही.स्टार विवेक महाराज केदार, रविवार (दि.०४) रोजी भागवताचार्य ह.भ.प.टी.व्ही.स्टार कविताताई साबळे सोनेवाडी, सोमवार (दि.०५) रोजी ह.भ.प.गीताताई महाराज घोरवडकर व मंगळवार (दि.०६) रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. वाल्मिक महाराज जाधव सटाणा, बागलाण यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने बसले असून सर्व भाविकांनी या भक्तीमय सोहळ्याचा आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भगवान विष्णु मंदिर कमिटी व अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.