पढेगाव व परिसराचे विकास प्रश्न सुटले नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार
पढेगाव व परिसराचे विकास प्रश्न सुटले नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार
पढेगाव व परिसराचे विकास प्रश्न सुटले नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार
कोपरगाव विजय कापसे दि ३१ जुलै २०२४:- कोपरगाव मतदार संघातील तालुक्याच्या पूर्व भागातील पढेगाव व परिसरातील रस्ते, पाणी पुरवठा योजना, पाझर तलाव, तलाठी कार्यालय आदी विकासाचे प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्याबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहे.
कोपरगाव मतदार संघातील विविध गावांमध्ये झालेल्या व प्रगतीपथावर असलेल्या विविध विकास कामांचा पाहणी आढावा आ. आशुतोष काळे घेत आहेत. या पाहणी दरम्यान पढेगाव येथील विविध विकासकामांचा व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी नुकताच घेतला. करंजी फाटा ते पढेगांव कॅनॉल रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे कासली, शिरसगाव, तिळवणी या गावातील नागरिकांनी कोपरगाव शहराकडे पाठ फिरवून वैजापूरशी संपर्क वाढवीला होता.नागरिकांना खराब रस्त्यामुळे होत असलेली अडचण लक्षात घेवून या ओगदी ते पढेगांव व करंजी फाटा ते पढेगांव कॅनॉल रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनचा या रस्त्यांचा प्रश्न कायमचा सुटला असून कासली, शिरसगाव, तिळवणी, उक्कडगाव आदी गावातील नागरिकांचा कोपरगाव शहराशी पुन्हा संपर्क जोडला जाऊन कोपरगावच्या बाजार पेठेची आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत झाली आहे. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची मोठी अडचण दूर झाली आहे. तसेच ओगदी ते पढेगांव रस्ता, कोपरगाव-वैजापूर रस्ता देखील दुरुस्त झाल्यामुळे नागरिकांच्या बहुतांश रस्त्याचे प्रश्न सुटले आहेत.
या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांचे प्रश्न व अडचणी जाणून घेतल्या.आजपर्यंत पढेगाव व परिसराचे विकासाचे जे प्रश्न सुटू शकले नाही ते प्रश्न सोडविले आहे. यापुढील काळात देखील विकासाचे उर्वरित प्रश्न सोडविणार असून त्याबाबत नागरिकांनी निश्चिंत रहावे अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिली. तसेच माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पात्र लाभार्थी माता भगिनींनी मुदतीच्या आत अर्ज भरण्याबाबत आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.