बिपीनदादा कोल्हे

डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे घर राष्ट्रीय स्मारक घोषित करा – बिपीनदादा कोल्हे

डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे घर राष्ट्रीय स्मारक घोषित करा – बिपीनदादा कोल्हे
डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे घर राष्ट्रीय स्मारक घोषित करा – बिपीनदादा कोल्हे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १ ऑगस्ट २०२४लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीनिमित्त संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगाव येथील स्मारकस्थळी उपस्थित राहून अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना कोल्हे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांचा पहिला अर्धाकृती पुतळा माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी पुढाकार घेऊन कोपरगाव येथे स्थापन केला.छायाचित्र उपलब्ध नव्हते त्यासाठी अण्णाभाऊंच्या कुटुंबियांकडून प्राप्त केले व त्यानंतर पुतळा तयार करून घेतला.त्यानंतर पूर्णाकृती पुतळा होण्यासाठी कोल्हे गटाने पुढाकार घेऊन कार्यवाही केली हे सर्वांना ठाऊक आहे.देशाचा अभिमान असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपली प्रतिभा त्या काळात परदेशात देखील सिद्ध केली होती.साहित्याला आकार देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा अभिमान सर्वांना आहे.स्वातंत्र्याची आणि सभिनानाची भावना आपल्या शाहिरीतून प्रत्येक मनावर त्यांनी बिंबवली.

जाहिरात

अण्णाभाऊ साठे यांचे विचार देशाला आणि युवा पिढीला ऊर्जा देणारे आहे.प्रेरणादायी महापुरुष म्हणून त्यांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा.यामुळे एका दैदिप्यमान विचारांची स्मृती जतन होण्यास मदत होईल.जगाला हेवा वाटेल असे स्मारक झाल्यास सर्वत्र आनंद होईल अशी मागणी बिपीनदादा कोल्हे यांनी यावेळी केली.

जाहिरात
या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष. दत्ता काले,रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, जितेंद्र रणशुर,विनोद राक्षे, बबलू वाणी, संदीप देवकर,सुखदेव जाधव,कैलास जाधव,प्रदिपराव नवले, राजेंद्र बागुल, शरद नाना थोरात, दिलीप तुपसैदर, शफिक सैय्यद, फकिरमंहमद पहिलवान, सतिश रानोडे, सोमनाथ म्हस्के, अल्ताफ कुरेशी, सुखदेव जाधव,सचिन सावंत, प्रसाद आढाव, शरद त्रिभुवन, विजय चव्हाणके ,रामचंद्र साळुंके, सुजल चंदनशिव, जगदीश मोरे, संजय तुपसैदर, आय्युब बागवान, अर्जुन मरसाळे, गोरख देवडे, दादाभाऊ नाईकवाडे, संजय जगदाळे, संदीप धुमसे, अशोक लकारे, बाळु जाधव, रवींद्र शेलार, उत्तमराव सोळसे, संदिप निरभवणे, विजयराव आढाव, सुशांत खैरे, खालिक कुरेशी, संतोष नेरे, जयप्रकाश आव्हाड, सतीश रानोडे, नारायण गवळी, जनार्दन कदम, सिद्धार्थ पाटणकर, मुकुंद उदावंत आदींसह मान्यवर समाजबांधव उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे